कार खरेदीसाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते, 10 लाखांवर किती EMI?
कार डीलर्सशी टाय-अप केलेल्या बँकासुद्धा आहेत, ज्या तुम्हाला सवलतीच्या दरात कार त्वरित खरेदी आणि डिलिव्हरी देतात. काही बँका त्यांच्या निवडक ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसताना पूर्व मंजूर कार कर्ज देतात. त्यामुळे कार लोन घ्यायला गेलो तर एकदा बँकांच्या व्याजदरांची तुलना करून बघा, कुठे किती टक्के कर्ज मिळते ते समजून घ्या.
नवी दिल्लीः आपण नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर बँकेचे व्याजदर नक्कीच माहीत करून घ्या, कारण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कार खरेदी करण्यापूर्वी आणि शोरूममध्ये जाण्यापूर्वी कुठे, किती स्वस्तात काम होईल याची माहिती मिळवा. खरं तर जवळपास सर्वच बँका सहज कार कर्ज देतात. फरक फक्त कर्जाच्या व्याजदरात असतो. काही बँका महाग कर्ज देतात, तर काही स्वस्त कर्ज देतात. स्वस्तात कार घ्यायची असेल तर ज्या बँकेचा व्याजदर कमी आहे, त्याच बँकेकडून कर्ज घ्यावे. यामुळे तुमचा ईएमआय कमी होईल आणि मूळ रकमेसह व्याजाची रक्कमही कमी होणार आहे.
ज्या तुम्हाला सवलतीच्या दरात कार देतात
कार डीलर्सशी टाय-अप केलेल्या बँकासुद्धा आहेत, ज्या तुम्हाला सवलतीच्या दरात कार त्वरित खरेदी आणि डिलिव्हरी देतात. काही बँका त्यांच्या निवडक ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसताना पूर्व मंजूर कार कर्ज देतात. त्यामुळे कार लोन घ्यायला गेलो तर एकदा बँकांच्या व्याजदरांची तुलना करून बघा, कुठे किती टक्के कर्ज मिळते ते समजून घ्या.
स्वस्त कार कर्ज कधी आणि कसे मिळवायचे?
कार कर्ज स्वस्त किंवा महाग हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 गुणांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला स्वस्त कार कर्ज मिळेल. जर क्रेडिट स्कोअर कमी किंवा खराब असेल तर कार कर्ज महागात पडेल किंवा ते अजिबात मिळणार नाही. कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर एकदा तपासून घ्या. कोणत्या बँकेचे कार कर्ज सर्वात स्वस्त आहे आणि 10 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल हे समजून घेऊयात.
PNB सर्वात स्वस्त कर्ज देते
पंजाब नॅशनल बँकेचे कार कर्ज 6.65 टक्के दराने उपलब्ध आहे आणि 10 लाखांच्या कर्जावर 19,636 रुपयांचा EMI भरावा लागेल. पंजाब आणि सिंध बँक 6.80 टक्के दराने कार कर्ज देते आणि 10 लाखांच्या कर्जावर 19,707 रुपयांचा EMI भरावा लागेल. बँक ऑफ इंडिया 6.85 टक्के दराने कार लोन देत आहे आणि 19,731 रुपये EMI भरावा लागेल. इंडियन बँक 6.90 टक्के दराने कार कर्ज देते आणि 10 लाखांच्या कर्जावर 19,754 रुपयांचा EMI भरावा लागेल.
बँकांचे व्याजदर तपासून घ्या
बँक ऑफ बडोदाचे कार कर्ज 7 टक्के दराने उपलब्ध आहे आणि 10 लाखांच्या कर्जावर 19,801 रुपयांचा EMI भरावा लागतो. स्टेट बँक ऑफ इंडिया 7.20 टक्के दराने कार कर्ज देत आहे आणि त्याचा EMI रुपये 19,896 असेल. सेंट्रल बँक 7.25 टक्के दराने कार लोन देत आहे आणि 19,919 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. युनियन बँक 7.25 टक्के दराने कार लोन देत आहे आणि 19,919 रुपये EMI भरावा लागेल. तुम्ही UCO बँकेकडून कार लोन घेतल्यास तुम्हाला 7.25 टक्के व्याज दराने कर्ज मिळते आणि EMI 19,919 रुपये असेल. कॅनरा बँक 7.30 टक्के दराने कार लोन देते आणि 19,943 रुपयांचा ईएमआय भरावा लागतो.
आणि EMI रुपये 19,943 असेल
बँक ऑफ महाराष्ट्र 7.30 टक्के दराने कार कर्ज देते आणि EMI रुपये 19,943 असेल. IDBI बँक 7.35 टक्के दराने कार कर्ज देते आणि 19,967 रुपये EMI असेल. Axis Bank 7.45 टक्के दराने कार लोन देते आणि 20,014 रुपयांचा EMI केला जाईल. इंडियन ओव्हरसीज बँक 7.55 टक्के दराने कार लोन देते आणि ईएमआय म्हणून 20,062 रुपये भरावे लागतील. येस बँकेचा व्याजदर 7.71% आहे आणि 20,138 रुपये EMI द्यावा लागेल.
संबंधित बातम्या
29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?
डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा मोफत अपघाती विमा, कोणाला लाभ मिळणार?