सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी

सर्वाधिक निधी रिलायन्स इंडस्ट्रीजने केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण 922 कोटी रुपये खर्च केलेत. इंडिया इंकने खर्च केलेल्या संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते. दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. TCS ने CSR वर एकूण 674 कोटी रुपये खर्च केले.

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी
मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 12:00 AM

नवी दिल्लीः Corporate Social Responsibility: कोरोनाच्या काळात भारतीय कंपन्यांनी सामाजिक कार्यावर फारच कमी खर्च केलाय. 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) वर एकूण 8828 कोटी रुपये खर्च केलेत. त्यात वार्षिक आधारावर 64 टक्क्यांची घसरण नोंदवली गेलीय, असंही एका अहवालात म्हटलंय.

संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते

अहवालानुसार, सर्वाधिक निधी रिलायन्स इंडस्ट्रीजने केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण 922 कोटी रुपये खर्च केलेत. इंडिया इंकने खर्च केलेल्या संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते. दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. TCS ने CSR वर एकूण 674 कोटी रुपये खर्च केले. या यादीत विप्रो तिसऱ्या क्रमांकावर आहे. विप्रोच्या वतीने 246 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

रिलायन्स नेहमीच सामाजिक कामांवर खर्च करण्यास कटिबद्ध आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत रिलायन्सनेही मोठा पाठिंबा दिलाय. कोरोनाविरुद्धच्या लढाईत रिलायन्सने विविध राज्य सरकारे आणि केंद्राला 561 कोटींचा निधी जारी केलाय.

नियमांमध्ये बदल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सरकारने सीएसआर निधीबाबत नियम बदललेत. कोरोना रुग्णांसाठी कंपन्या जे काम करतील ते CSR अंतर्गत नोंदवले जातील, असे सरकारने म्हटलेय. कोरोनासाठी कंपन्यांच्या वतीने करण्यात आलेला खर्च CSR निधीमध्ये मोजला जात आहे.

अमेरिकेतील वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मुकेश अंबानी मुलांमध्ये संपत्ती वाटणार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​(RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी आपला हा अवाढव्य पसरलेला व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. ते जगभरातील अब्जाधीश कुटुंबांमध्ये वारसा वाटप किंवा वारस निवड पद्धतींचा अभ्यास करीत आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत भागभांडवल वाटपाच्या वादामुळे ते आधीच सावध झालेत आणि आता या कामासाठी योग्य मॉडेल शोधत आहे, जेणेकरून मुलांमध्ये भविष्यातील मालमत्तेवरून वाद होऊ नयेत.

संबंधित बातम्या

20 कोटी दंड किंवा दीड वर्षाची शिक्षा; सरकार क्रिप्टोकरन्सीविरोधात प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

झूम मीटिंगद्वारे ‘त्या’ कंपनीच्या थेट 900 जणांना नारळ, नोकरीवरून काढणारे सीईओ नेमके कोण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.