Ratan Tata Will: रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या ओला, अपस्टॉक्स इतर 18 स्टार्टअप्समधील पैसा कोणाला मिळणार? मृत्यूपत्रातून खुलासा

Ratan Tata Investment: रतन टाटा यांनी 2022 मध्ये 'रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन' तयार केले होते. ही सामाजिक संस्था म्हणून काम करते. रतन टाटा यांनी या फाउंडेशनची निर्मिती टाटा कुटुंबाच्या परंपरेनुसार केली आहे. यापूर्वी देखील टाटा कुटुंबातील सदस्यांनी त्यांची मालमत्ता फाउंडेशनला दान केली होती.

Ratan Tata Will: रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या ओला, अपस्टॉक्स इतर 18 स्टार्टअप्समधील पैसा कोणाला मिळणार? मृत्यूपत्रातून खुलासा
Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 6:47 PM

Ratan Tata Investment: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईत 9 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांची असलेल्या संपत्ती आणि गुंतवणुकीसंदर्भात रतन टाटा यांनी मृत्यूपत्र करुन ठेवले होते. त्यांची संपत्ती 10 हजार कोटींहून अधिक आहे. ही संपत्ती कोणाला मिळणार? या संपत्तीचा वारसदार कोण? त्यांनी गुंतवणूक केलेल्या स्टॉर्टअपमधील निधीचे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे. ओला, ओला इलेक्ट्रिक, अपस्टॉक्स, क्योरफिट आणि अरबन कंपनी या सारख्या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली होती.

18 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

रतन टाटा यांनी त्यांच्या परिवाराचे सदस्यांपासून त्यांचा आवडता श्वान, घरातील कर्मचारी, त्यांच्या सामाजिक संस्था सर्वांचा उल्लेख मृत्यूपत्रात केला आहे. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात म्हटले आहे की, आरएनटी असोसिएट्स आणि एएनएटी सल्लागारांमार्फत स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ते लिक्विडेट केले जातील, म्हणजेच या कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक किंवा शेअर होल्डिंग्स रद्द केले जातील.

रतन टाटा यांनी वैयक्तिकरित्या 18 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये ओला, ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, स्नॅपडील, ट्रॅक्सन, फर्स्ट क्राय, कार देखो, कॅश करो, क्युअर फिट, ब्लू स्टोन, अपस्टॉक्स, अर्बन कंपनी, अर्बन लॅडर आणि मोग्लिक्स या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधून गुंतवणूक काढून ती त्यांच्या ‘रतन टाटा एन्डॉमेंट फाऊंडेशन’ (आरटीईएफ) ला देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर

रतन टाटा यांनी 2022 मध्ये ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ तयार केले होते. ही सामाजिक संस्था म्हणून काम करते. रतन टाटा यांनी या फाउंडेशनची निर्मिती टाटा कुटुंबाच्या परंपरेनुसार केली आहे. यापूर्वी देखील टाटा कुटुंबातील सदस्यांनी त्यांची मालमत्ता फाउंडेशनला दान केली होती. यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांचाही समावेश आहे. या फाउंडेशनकडे टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर आहे. टाटा ट्रस्ट संपूर्ण ग्रुपचा मालक आहे.

Non Stop LIVE Update
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.