Mukesh Ambani : रिलायन्सच्या उभारणीत या व्यक्तीचाही मोठा वाटा! मुकेश अंबानी यांचा राईट हँड आहे तरी कोण?

Mukesh Ambani : रिलायन्स समूह उभारण्यात अंबानी कुटुंबियांची मोठी मेहनत आहे. पण या सोबतच आणखी काही दिग्गजांनी या समूहाला मोठे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ते रिलायन्सच कुटुबांचे एक भाग झाले आहेत. मोठ्या निर्णयात त्यांचा सल्ला मोलाचा मानण्यात येतो.

Mukesh Ambani : रिलायन्सच्या उभारणीत या व्यक्तीचाही मोठा वाटा! मुकेश अंबानी यांचा राईट हँड आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. आपण जेव्हा रिलायन्स समूहातील (Reliance Group) थिंक टँकचा विचार करतो, तेव्हा अंबानी कुटुंबियांसोबतच, एका नावाची ही चर्चा होते. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे तर प्रमुख आहेतच. या थिंक टँकमध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे. रिलायन्सच्या प्रमुख निर्णयात त्यांचा सल्ला मोलाचा मानण्यात येतो. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उभारणीत त्यांचा ही मोठा हातभार आहे. मनोज मोदी (Manoj Modi) हे रिलायन्स विश्वातील मोठे नाव आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांचे ते उजवे हात मानल्या जातात. ते अंबानी यांचे वर्गमित्र पण आहेत. मुकेश अंबानी यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्यांच्या मित्रांनाही समूहात महत्वाचे अधिकार दिले आहेत.

मनोज मोदी (Manoj Modi) यांचे नाव तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ते कोणत्याच बातमीत नसतात. पण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोदी एक प्रमुख व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुख निर्णयात त्यांचा सहभाग असतो. त्यांना मुकेश अंबानी यांचा उजवा हात संबोधण्यात येते.

फेसबुक सोबत 5.7 अब्ज डॉलरचा करार करण्यात मनोज मोदी यांची प्रमुख भूमिका होती. ते मुकेश अंबानी यांचे वर्गमित्र होते. दोघांनी अभियांत्रिकीचे सोबतच शिक्षण घेतले आहे. ते एमएम (MM) नावाने ओळखले जातात.

हे सुद्धा वाचा

मनोज मोदी यांच्याकडे अनेक वर्षांपासून कोणतेही पद नाही. पण त्यांच्या शब्दाला रिलायन्समध्ये मोठी किंमत आहे. रिलायन्सच्या प्रत्येक निर्णयामागे यांच्या मताला मोठे महत्व आहे. अनेक निर्णय घेण्यापूर्वी यांचा सल्ला मोलाचा असतो. ते रिलायन्स समूहात मोठ्या पदावर आहेत. त्यांच्या शब्दाशिवाय रिलायन्समध्ये पान हालत नाही. मनोज मोदी सध्या रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) चे संचालक आहेत.

मनोज मोदी मुकेश अंबानी यांचे जुने मित्र आहेत. ते अभियांत्रिकी महाविद्यालपासून मित्र आहेत. या दोघांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) सोबतच इंजिनिअरिंग केले आहे. दोघांकडे केमिकल इंजिनिअरिंगची (Chemical Engineering) पदवी आहे.

मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत जोडल्या गेले. त्यांनी अंबानींच्या तीन पिढ्यांसोबत काम केले आहे. एमएम यांनी धीरुभाई अंबानी यांच्यानंतर मुकेश अंबानी आणि आता ईशा, आकाश आणि अनंत यांच्यासोबत ही काम केले आहे.

2007 साली मनोज मोदी यांना संचालक पदी होते. मोदी हजीरा पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्स, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम उद्योग, रिलायन्स रिटेल, 4जी यासारख्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होते.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.