MRF Tyre : 60 वर्षांपासून फेव्हिकॉलचा मजबूत जोड, MRF टायरचा मसलमॅन आहे तरी कोण

MRF Tyre : MRF टायरचा शेअर लाखमोलाचा ठरला आहे. भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सर्वात महागडा शेअर म्हणून एमआरएफने इतिहास रचला आहे. आता चर्चा रंगली आहे ती MRF टायरचा मसलमॅनची. या टायरच्या जाहिरातीत हा मसलमॅन नेहमी दिसतो, तो आहे तरी कोण?

MRF Tyre : 60 वर्षांपासून फेव्हिकॉलचा मजबूत जोड, MRF टायरचा मसलमॅन आहे तरी कोण
कहाणी एका ब्रँड लोगोची
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 2:47 PM

नवी दिल्ली : MRF टायरने इतिहास रचला आहे. टायर तयार करणाऱ्या या कंपनीने शेअर बाजारात इतिहास रचला आहे. हा शेअर लाखमोलाचा ठरला आहे. हा शेअर बाजारातील सर्वात महागडा स्टॉक (Expensive Stock) ठरला आहे. एमआरएफच्या शेअरने एक लाखांचा टप्पा गाठलाच नाही तर ओलांडला आहे. 11 वर्षांत एमआरएफचा शेअर 1200 रुपयांहून 900 टक्के चढला आणि 1 लाख रुपयांवर पोहचला. ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली, ते आज कोट्याधीश झाले आहेत. आता चर्चा रंगली आहे ती MRF टायरचा मसलमॅनची. या टायरच्या जाहिरातीत हा मसलमॅन नेहमी दिसतो, तो आहे तरी कोण?

फुगे विक्रेत्याची कंपनी तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की एका फुगे विक्रेत्याने एमआरएफची स्थापना केली आहे. त्यावेळी कोणाला वाटलं ही नाही की ही भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरेल म्हणून. के. एम मेमन मापिल्लई ( K.M. Mammen Mappillai) हे अगोदर फुगे विकत होते. 1946 मध्ये त्यांनी एमआरएफ कंपनीची सुरुवात केली. पण मसलमॅन विषयी कुतुहल कायम राहिले.

MRF च्या लोगोची कहाणी MRF च्या लोगोमध्ये एक पिळदार शरीरयष्टी असलेला ताकदवान माणूस हातात टायर घेऊन उभा दिसतो. टीव्हीवर, वृत्तपत्र, होर्डिंग, पोस्टर या ठिकाणी एमआरएफचा लोगो असलेला माणूस तुम्ही पाहिला असेल. पण त्याची कहाणी अनेकांना माहिती नाही. एमआरएफच्या या लोगोला मसलमॅन असे नाव देण्यात आले आहे. 1964 मध्ये MRF च्या या मसलमॅनचा जन्म झाला.

हे सुद्धा वाचा

या देशात झाला लोगो तयार तर बेरुत येथील एमआरएफच्या कार्यालयात या मसलमॅन लोगोचा जन्म झाला. लेबनॉन हा पहिला देश होता, जिथे एमआरएफच्या टायरची विक्री होत होती. कंपनीची वेगळी ओळख, उत्पादनाला नवीन ओळख देण्यासाठी एक हटके लोगो असायला हवा, या विचाराने के. एम मेमन मापिल्लई झपाटले होते. त्यांना एक आगळावेगळा लोगो हवा होता.

कोणी केला तयार लोगो एमआरएफच्या मसल मॅनचा लोगो लोकप्रिय आणि गाजलेले एडगुरु Alyque Padamsee यांनी तयार केला होता. टायर कंपनीसाठी दमदार लोगो तयार करण्यासाठी त्यांनी अगोदर अनेक ट्रक चालकांशी संवाद साधला. हा लोगो लगेच तयार झाला नाही. त्यासाठी अलीक पदमसी यांनी अनेक आठवडे सर्व्हे केला. ट्रक ड्रायव्हरच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. लोगो डिझाईनसाठी मोहिम चालविण्यात आली. तिचे मार्केटिंग करण्यात आले.

ट्रकचालकांना केला समर्पित एमआरएफ मसलमॅनचे डिझाईन तयार करताना केवळ एकच डिझाईन अलीक पदमसी यांच्या डोक्यात होते. त्याकाळी एमआरएफचे टायर ट्रकसाठी सर्वाधिक वापरात होते. ट्रक ड्रायव्हर, मजबूत आणि दीर्घकाळ चालणारे टायरच्या पक्षाकडून होते. त्यामुळे या मसलमॅनचा जन्म झाला. या लोगोला अर्थातच सर्वांनीच डोक्यावर घेतले. एमआरएफ आणि मसलमॅन हे समीकरण अजून अतूट आहे. लोगोतील मसलमॅन काळानुरुप आधुनिक झाला असेल. पण हा फेव्हिकॉल अतूट जोड आजही कायम आहे. या लोगोची दुचाकी, चारचाकी वापरणाऱ्यांच्या मनावर खोलवर मोहिनी आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.