Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातोशी नाकामोटो झाला की धनकुबेर! Bitcoin शी या गुढ नावाचे काय आहे कनेक्शन

Satoshi Nakamoto Bitcoin | बिटकॉईनने इतिहास रचला आहे. अवघ्या 6 पैशांवरुन तो आता 60 लाखांच्या घरात पोहचला आहे. बिटकॉईन हे आभासी चलन आहे. पण त्याचा मालक कोण? हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. सातोशी नाकामोटो हे नाव बिटकॉईन संदर्भात येते. पण ते नाव किती खरं, ते व्यक्तीचे नाव आहे की एखाद्या समूहाचे याविषयीचा हा वृत्तांत..

सातोशी नाकामोटो झाला की धनकुबेर! Bitcoin शी या गुढ नावाचे काय आहे कनेक्शन
Satoshi Nakamoto हा तरी कोण Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 9:27 AM

नवी दिल्ली | 15 March 2024 : बिटकॉईनने अजून काही उसंत घेतलेली नाही. त्याची घौडदौड सुरुच आहे. 2024 खऱ्या अर्थाने बिटकॉईन वर्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज बिटकॉईनमध्ये 4 टक्क्यांची घसरण दिसत आहे. बिटकॉईन 60 लाखांहून थेट 56 लाख 43 हजारांवर येऊन ठेपलंय. पण गुंतवणूकदारांना ते अजून एक मोठी झेप घेणार असल्याची आशा आहे. पण बिटकॉईनचा मालक नेमका कोण आहे, ही चर्चा पण देशासह जगात रंगली आहे. इंग्लंडमध्ये तर यासंदर्भात एक खटलाच सुरु आहे. Bitcoin शी Satoshi Nakamoto या नावाचे काय आहे कनेक्शन?

  1. Bitcoin 60 लाखांच्या घरात – या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2024 रोजी बिटकॉईनची किंमत 45 हजार डॉलर इतकी होती. काल परवा बिटकॉईनची किंमत जवळपास 72 हजार 800 डॉलरच्या घरात होती. भारतीय चलनात ही किंमत 60,28,145 रुपये आहे. डिसेंबर 2021 नंतर 63,725 डॉलरपेक्षा तो पुढे गेला. आज बिटकॉईनमध्ये 4.69 टक्क्यांची घसरण दिसून आली. बिटकॉईन भारतीय चलनात 56 लाखांपर्यंत खाली घसरला.
  2. अशी झाली सुरुवात – सातोशी नाकामोटो याने 2009 मध्ये बिटकॉईन या नावाने हे क्रिप्टो चलन तयार केले होते. तेव्हा या चलनाची किंमत अवघी 0.0008 डॉलर होती. म्हणजे केवळ 6 पैसे होते. विना सरकारी नियंत्रण असलेली भविष्यातील ऑनलाईन पेमेंट प्रणालीच्या रुपाने हे चलन बाजारात उतरविण्यात आले होते. पण सातोशी नाकामोटो आहे तरी कोण हे गुढ त्याच्या स्थापनेपासूनच कायम होते. ही व्यक्ती आहे की संस्था, मित्रांचा समूह असा प्रश्न आजही कायम आहे.
  3. इतक्या संपत्तीचा धनी – तर हा सातोशी नाकामोटो हा अजूनही सर्वांसाठी अज्ञातच आहे. पण त्याने खरेदी केलेल्या, त्याच्याकडे असलेल्या बिटकॉईनची काही माहिती हाती आलेली आहे. BTC होल्डिंगनुसार, 2020 मध्ये या पठ्ठ्याकडे, 54,316 ब्लॉकच्या माध्यमातून 11,25,150 बिटकॉईन होते. गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार, तो 10.9 दशलक्ष डॉलरचा धनी होता. म्हणजे भारतीय चलनात जवळपास 90,345 कोटींचा मालक होता. तर त्याची होल्डिंग ही 63.4 दशलक्ष डॉलर म्हणजे 5,25,977 कोटी इतकी होती. अर्थात त्यात आणखी मोठी भर पडली आहे.

युकेमध्ये खटला

Criag Wright या बिटकॉईनमधील मोठ्या गुंतवणूकदाराने बिटकॉईनच्या या अज्ञात मालकाविरोधात, Satoshi Nakamoto खटला दाखल केला आहे. ही व्यक्ती, समूह, संस्था नेमकी आहे तरी काय, असा त्याचा सवाल आहे. ब्रिटनमधील न्यायालयात या विषयी खटला दाखल करण्यात आलेला आहे. बिटकॉईनची मालकी आणि बौद्धिक मालमत्तेसंदर्भातील वादाचा मुद्दा या खटल्याचा गाभा आहे. तर जोपर्यंत हा मालक स्वतःहून पुढे येत नाही. तोपर्यंत तरी सातोशी नाकामोटोचे गुढ कायम राहील.

हे सुद्धा वाचा
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.