कोण होणार रिलायन्सचा उत्तराधिकारी? मुकेश अंबानी बनवतायत महत्त्वाचा प्लॅन : रिपोर्ट

64 वर्षीय मुकेश अंबानी यांची स्वतःची संपत्ती फक्त 7 लाख कोटी रुपये ($94 अब्ज) आहे. त्यांनी आपल्या वारसदाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांनी यावर अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी आहे. पण मुकेश अंबानी सक्रियपणे उत्तराधिकार योजना आखत असल्याचे कंपनीच्या सध्याच्या कामकाजावरून स्पष्ट होते.

कोण होणार रिलायन्सचा उत्तराधिकारी? मुकेश अंबानी बनवतायत महत्त्वाचा प्लॅन : रिपोर्ट
mukesh amabni
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 5:20 PM

नवी दिल्लीः आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींचा नामाभिधान आहे. पण एवढी श्रीमंत व्यक्ती आता आपला उत्तराधिकारी शोधत असल्याचीही चर्चा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेले मुकेश अंबानी त्यांच्याकडे असलेल्या 15.48 लाख कोटी ($ 208 अब्ज) व्यवसायाच्या साम्राज्यासाठी उत्तराधिकार नेमण्याचा प्लॅन बनवत आहेत.

अंबानींचा वॉल्टन कुटुंबानं (Sam Walton) दाखवलेल्या मार्गावरून चालायचा निर्णय

ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालात महत्त्वाचा दावा करण्यात आलाय. तेलापासून दूरसंचार क्षेत्रापर्यंत पसरलेल्या अवाढव्य व्यवसायासाठी मुकेश अंबानी यांनी वॉल्टन कुटुंबानं (Sam Walton) दाखवलेल्या मार्गावरून चालायचा निर्णय घेतलाय. जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे मालक असलेले वॉलमार्ट इंकचे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी एक अतिशय सोपे मॉडेल स्वीकारले. कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलेच पाहिजे, पण व्यवस्थापन नियंत्रण वेगवेगळ्या हातात देणे आवश्यक आहे, असा तो मॉडेल होता.

वारसदाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही

64 वर्षीय मुकेश अंबानी यांची स्वतःची संपत्ती फक्त 7 लाख कोटी रुपये ($94 अब्ज) आहे. त्यांनी आपल्या वारसदाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांनी यावर अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी आहे. पण मुकेश अंबानी सक्रियपणे उत्तराधिकार योजना आखत असल्याचे कंपनीच्या सध्याच्या कामकाजावरून स्पष्ट होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील मुकेश अंबानी यांचा हिस्सा मार्च 2019 मधील 47.27 टक्क्यांच्या तुलनेत 50.6 टक्के झालाय.

अंबानींचा अवाढव्य व्यवसाय सांभाळण्यासाठी नवी पिढी तयार

जूनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक आमसभेला (AGM) मुकेश अंबानींनी संबोधित केले. मुकेश अंबानींची मुले आता कुटुंबाच्या विशाल साम्राज्यात एक प्रमुख स्थान व्यापतील, असंही सांगण्यात येतेय. मुकेश अंबानींनी या बाबतीत खूप आधी विचार केलाय. त्यांची जुळी मुले आकाश आणि ईशा अंबानी किरकोळ आणि दूरसंचार यांसारख्या नवीन काळातील व्यवसायांमध्ये सक्रिय भूमिका बजावतायत. 2014 मध्ये दोघांनाही रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायात संचालक करण्यात आले. सध्या त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये संचालक आहे. तसेच तो रिलायन्स रिन्यूएबल एनर्जी आणि ऑईल अँड केमिकल युनिटचा व्यवसायही पाहत आहे.

‘या’ बोर्डाचे रिलायन्स इंडस्ट्रीजवर संपूर्ण नियंत्रण असणार?

व्यवसायाचा वारसा सुरळीतपणे सुपूर्द करण्यासाठी मुकेश अंबानी हे ट्रस्टप्रमाणे कुटुंबाला अधिकार देतील, असा दावासुद्धा अहवालात करण्यात आलाय. या बोर्डाचे रिलायन्स इंडस्ट्रीजवर संपूर्ण नियंत्रण असेल. यात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, तिन्ही मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश असेल. मुकेश अंबानी यांच्या निकटवर्तीयांचाही यात समावेश केला जाऊ शकतो. बाहेरील व्यावसायिकांवर कंपनीचा मुख्य व्यवसाय पाहण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिक रेल्वेच्या सवलतींपासून वंचित; 4 कोटी जणांकडून पूर्ण भाड्याची वसुली

गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.