सर्वसामान्यांना झटका! घाऊक महागाईमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या का वाढले वस्तुंचे दर?

देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात घाऊक माहागाई तब्बल 12.54 टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये हेच प्रमाण 10.66 टक्के इतके होते.

सर्वसामान्यांना झटका! घाऊक महागाईमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या का वाढले वस्तुंचे दर?
Vegetable-Image
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 2:00 PM

नवी दिल्ली –  देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात घाऊक माहागाई तब्बल 12.54 टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये हेच प्रमाण 10.66 टक्के इतके होते. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. झपाट्याने होत असलेल्या इंधन आणि विजेच्या  दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. कच्च्या मालाच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे वस्तूंच्या एमआरपी दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय उत्पादकांकडून घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका सध्या ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येते.

किरकोळ बाजारातही वस्तूंच्या किमती वाढल्या 

घाऊक बाजारात महागाई वाढल्याने त्याचा परिणाम किरकोळ विक्री बाजारपेठेवर देखील झाला आहे. किरकोळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तुंच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. सरकारने महागाईबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई 10.66 टक्क्यांनी वाढली होती. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये  ती 12.54 टक्क्यांवर पोहोचली आहे, याचाच अर्थ असा की गेल्या एका महिन्यामध्ये घाऊक महागाईत तब्बल 1.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या महिन्यात अन्न, धान्यांसोबतच भाजीपाल्याचे रेट देखील वाढले आहेत.

डिसेंबरमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता 

दरम्यान याबाबत बोलताना अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, महागाई कमी होणार की वाढणार हे पूर्णपणे इंधनाच्या किमतीवर अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. विजेचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. सोबतच एलपीजी गॅसच्या किमती देखील गगणाला भिडल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. इंधन स्वस्त झाले नसते तर या महिन्यामध्ये महागाई आणखी वाढली असती.आता इंधन स्वस्त झाल्याने पुढील महिन्यात कदाचीत काही प्रमाणात महागाई कमी होऊन, सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

संबंधित बातम्या 

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आठवडाभर दिवसातून सहा तास बंद राहणार रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

किड्स पॅन कार्ड कसे काढावे? काय आहेत त्याचे फायदे; जाणून घ्या

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.