क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत

कोरोना काळात क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली आहे. Bitcoin value increased during economic crisis

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात 'या' कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 3:57 PM

नवी दिल्ली: कोरोना काळामध्ये बिटकाईनने त्यांचे कमाईचे रेकॉर्डस मोडले आहेत. बिटकाईन ही ऑनलाईन स्वरुपातील क्रिप्टोकरन्सी आहे. कोरोना काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या बिटकॉईननं कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये मोठी झेप घेतली. इंटरनेटवर बिटकॉईन सारख्या अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत. जगामध्ये सध्या 1500 क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. सोशल मीडिया कंपनी फेसबूकने काही दिवसांपूर्वी लिब्रा या नावाची क्रिप्टोकरन्सी घोषित केली होती. बिटकाईन एथरियम आणि लिब्रा यांच्यापेक्षा वेगानं वाढत आहे. (Why Cryptocurrency Bitcoin value increased during economic crisis)

बिटकाईनने त्यांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडत आतापर्यंची सर्वाधिक कमाई केली आहे. एका बिटकॉईनची किमंत पहिल्यांदा 20 हजार डॉलरच्या वर पोहोचली. बिटकॉईनच्या किमंतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये 213 टक्के वाढ झाली आहे. 17 डिसेंबर 2019 ला एका बिटकाईनची किंमत 6 हजार 641 डॉलर होती. एका वर्षानंतर म्हणजेच 16 डिसेंबर 2020 ला एका बिटकॉईनची रक्कम 20 हजार 791 डॉलरवर पोहोचली आहे. (Why Cryptocurrency Bitcoin value increased during economic crisis)

बिटकॉईनचे मूल्य का वाढलं?

कोरोना महामारीच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था संकटात आल्या आहेत. ज्या क्षेत्रात कोणताही धोका नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल आहे. सुरुवातीला लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. परिणामी सोन्याचे दर वाढले. त्यानंतर लोकांनी बिटकाईनला पसंती दिली कारण यामध्ये बँकांची कसलिही झंझट नसते. यावरील व्यवहार मुक्त आहेत. यामुळे गुंतवणुकीसाठी बिटकॉईनकडे लोकांचा कल वाढतोय. परिणामी बिटकॉईनच्या किमंती वाढत आहेत.

बिटकॉईन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सी देखील आहेत. मात्र, त्यांचं मूल्य वाढलेले दिसले नाही. बिटकॉईनची किमंत वाढतेय याला यामध्ये गुंतवणूक करणारे लोक आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनी बिटकाईनमध्ये गुंतवणूक केली आहे. दोघांनी बिटकाईनबाबत विश्वास व्यक्त केला आहे. जॅक दोरसेंनी बिटकॉईनमध्ये 50 मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय. 5 हजार बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी जॅक दोरसेंनी प्लॅन बनवला आहे. अमेरिकेतील प्रमुख कंपनी पे-पलनेही बिटकॉईनच्या व्यवहारांना मंजुरी दिली आहे. यामुळे देखील लोकांचा बिटकाईनवरील विश्वास वाढला आहे. लोक बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत आहेत.(Why Cryptocurrency Bitcoin value increased during economic crisis)

हॅकिंगचा परिणाम

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढण्यास अमेरिकेत सोमवारी झालेले हॅकिंग कारणीभूत आहे. सोमवारी झालेल्या हॅकिंगमुळे अमेरिकेतील अनेक एजन्सी प्रभावित झाल्या होत्या. अमेरिकेकडून रशियाने हॅकिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॅकिंगचा अमेरिकेतील कॉईनबेस या क्रिप्टोकरन्सीवर मोठा परिणाम दिसून आला. त्यांचे व्यवहार काही काळासाठी ठप्प झाले होते. यानंतर लोकांचा कॉईनबेसवरील विश्वास कमी झाला. या घटनेनंतर लोकांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च महिन्यात बिटकॉईनलाही फटका बसला होता. बिटकॉईनची किंमत 25 टक्क्यांनी उतरली होती. मात्र, सध्या यामधील गुंतवणूक वाढली आहे. केंद्रीय बँका आणि इतर संस्थांवर हॅकिंगचं आणि कोरोनाचं संकट आहे. याकाळात लोकांना बिटकॉईन सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे बिटकॉईनचा वापर वाढला आहे. (Why Cryptocurrency Bitcoin value increased during economic crisis)

अमेरिकेतील मोठी कंपनी करणार गुंतवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेतील वॉल स्ट्रीट ही कंपनी इच्छूक आहे. यामुळेही बिटकाईनचे मूल्य वाढले आहे. जगातील प्रसिद्ध कंपनी गुगेनहीम पार्टनर्सने 5.3 बिलीयन डॉलर मालमत्तेतील 10 टक्के रक्कम बिटकाईनमध्ये लावण्याचे जाहीर केले आहे. 2008 मध्ये जागतिक महामंदी सुरु असताना बिटकाईनची सुरुवात झाली होती.

संबंधित बातम्या:

सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

(Why Cryptocurrency Bitcoin value increased during economic crisis)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.