Ratan Tata : 4 वेळा प्रेमात पडलो पण मी मागे हटलो, कारण…; रतन टाटांनी सांगितलं लव्ह लाईफ
इतकं यश मिळवलं पण तरीही टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटासारख्या दिग्गज व्यक्तीने कधीच लग्न का केलं नाही?
मुंबई : रतन टाटा कोण आहेत हे सांगण्याची गरजच नाही. कारण, ते अनेकांचं प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोललं जात नाही पण, त्यांच्या यशाचा आणि त्यांनी उभारलेल्या व्यवसायाची आज जगभरात चर्चा आहे. त्यांनी आपला देश संकटात असतानाही वेळोवेळी मोलाची मदतही केली. खरंतर, रतना टाचांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. इतकं यश मिळवलं पण तरीही टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटासारख्या दिग्गज व्यक्तीने कधीच लग्न का केलं नाही? अखेर काही दिवसांआधी रतन टाटा यांनीच याबद्दल मोठा खुलासा केला होता. (why ratan tata did not marry here is the answer told by ratan tata in interview)
आपल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतः आपल्या प्रेमाविषयी सांगितलं. त्यांच्या आयुष्यात प्रेमाने एकदा नाही, तर चारवेळा ठोठावलं होतं. मात्र, आयुष्यातील कठिण काळात हा प्रेमाचा धागा टिकला नाही.
यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच लग्नाविषयी विचार केला नाही. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरतमध्ये झाला होता. त्यांनी टाटा समुहाला नव्या उंचीवर नेताना आपली स्वतःचीही एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यवसायात उत्तुंग यश मिळवणाऱ्या रतन टाटा यांना प्रेमात मात्र अपयशाचा सामना करावा लागला. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविवाहित असलेल्या रतन टाटांनी आपल्या प्रेमाविषयी मनमोकळेपणाने सांगितलं.
रतन टाटा म्हणाले, “मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही. मात्र दूरगामी विचार केला तर लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. कारण मी लग्न केलं असतं तर आताची परिस्थिती काहीशी अधिक गुंतागुंतीची राहिली असती. जर तुम्ही मला विचारलं की मी कधी प्रेम केलं नाही का? तर मी हेच सांगेल की मी 4 वेळा प्रेम करुन लग्नावर गंभीर विचार केला. मात्र, प्रत्येकवेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मी मागे हटलो.”
आपल्या प्रेमाच्या दिवसांविषयी बोलताना रतन टाटा म्हणाले, जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी प्रेमाविषयी सर्वात जास्त गंभीर झालो होतो. केवळ मी तेव्हा भारतात परत आल्याने आम्ही लग्न करु शकलो नाही.” रतन टाटा यांच्या प्रेयसीला भारतात यायचं नव्हतं. त्या काळात भारत आणि चीनचं युद्ध सुरु होतं. अखेर रतन टाटा यांच्या प्रेयसीने अमेरिकेत दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. ज्या व्यक्तीवर त्यांनी प्रेम केलं ती व्यक्ती आताही शहरात आहे का? असं विचारलं असता त्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र, त्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. (why ratan tata did not marry here is the answer told by ratan tata in interview)
गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं मिळणार; ठाण्यातील तरुण उद्योजकाला रतन टाटांचा मदतीचा हात
बादशाहाच्या टोपीला मुजरा! ‘रोखठोक’मधून संजय राऊतांचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल
(why ratan tata did not marry here is the answer told by ratan tata in interview)