Noel Tata: नोएल टाटासंदर्भात काय विचार करत होते रतन टाटा, पुस्तकातून मोठा खुलासा

Ratan Tata and Noel Tata: 2011 मध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हा त्यात नोएल टाटा यांचाही समावेश होता. परंतु रतन टाटा यांचा समावेश या समितीत नव्हता. कारण...

Noel Tata: नोएल टाटासंदर्भात काय विचार करत होते रतन टाटा, पुस्तकातून मोठा खुलासा
Ratan Tata and Noel Tata
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 10:24 AM

Ratan Tata and Noel Tata: भारतीय उद्योग विश्वातील चमकता तारा रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची सूत्र आली. नोएट टाटा आता टाटा ट्रस्टचे चेअरमन झाले. म्हणजेच 165 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचे टाटा ग्रुपचे कंट्रोल नोएल टाटा यांच्याकडे आले आहे. नोएल टाटा यांच्यासंदर्भात रतन टाटा यांचा विचार काय होता? यासंदर्भात एका पुस्तकातून खुलासा समोर आला आहे.

‘रतन टाटा ए लाइफ’ या पुस्तकात थॉमस मॅथ्यू यांनी लिहिले आहे की, 2011 मध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हा त्यात नोएल टाटा यांचाही समावेश होता. परंतु रतन टाटा यांचा समावेश या समितीत नव्हता. त्यांच्या उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीपासून ते दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर त्यांना या निर्णयाचा पश्चाताप झाला.

रतन टाटा का राहिले निवड समितीपासून दूर

रतन टाटा निवड समितीपासून का दूर राहिले? त्याचे स्पष्टीकरण पुस्तकात दिले आहे. त्यात म्हटले आहे की, टाटा ग्रुपमधून अनेक उमेदवार होते. रतन टाटा यांना हा निर्णय सामूहिक हवा होता. समितीवर कोणाचाही प्रभाव नको होता. उमेदवार म्हणून त्यांचे चुलत भाऊ नोएल टाटाही स्पर्धेत होते. त्यामुळे त्यांनी समितीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता.

रतन टाटा यांनी काय म्हटले?

टाटा कंपनीतील पारशी आणि इतर समाजाच्या दरम्यान नोएल टाटा यांना स्वतःचे मानले जात होते. परंतु रतन टाटा यांच्यासाठी केवळ व्यक्तीची प्रतिभा आणि मूल्ये महत्त्वाची होती. तसेच समितीने नोएल टाटा यांची शिफारस केली नसती तर नोएल यांना रतन टाटा यांनी विरोध केला, असे वाटले असते. पुस्तकातील माहितीनुसार, रतन टाटा म्हणाले की, सर्वोच्च पदासाठी नोएल यांना अजून अनुभव कमी आहे. त्यांना यापेक्षा जास्त अनुभव असायला हवा होता. नोएल यांच्या ठिकाणी माझा मुलगा असला तरी मी असे काही केले असते की तो उत्तराधिकारी होऊ शकला नसता, असे रतन टाटा यांनी म्हटले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.