तुमचा PF कापला जात आहे तर भविष्याची चिंता कशाला ?
तुमच्या पगारातून दर महिन्याला PF कापला जात असेल तर भविष्याची चिंता अजिबात करू नका
मुंबई : सरकारकडून नोकरदारांच्या पगारातून पीएफ कापला जातो. ही रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत म्हणजेच EPFO मध्ये कर्मचाऱ्याच्या नावावर दरमहा जमा केली जाते. प्रत्येक पगारदार व्यक्तीचे EPFO खाते असते ज्याच्या खाते क्रमांकाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN म्हणतात. तुमच्या कामकाजाच्या आयुष्यात खाते सारखेच असते. नियमांनुसार, 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कंपन्या आणि संस्था ईपीएफओच्या कक्षेत येतात. प्रत्येक कंपनीला 15000 रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना पीएफ योजनेत समाविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यांचे पगार जास्त आहेत त्यांचाही कंपनीत समावेश होऊ शकतो. PF अजून कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :