प्रवाशांना दिलासा, विमान प्रवास होणास स्वस्त; जेट फ्यूलच्या दरात कपात

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे, सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गुरुवारी एव्हीएशन टर्बाइन ऑईल फ्यूल (ATF) किमतीमध्ये कपात केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये जेट फ्यूलचे दर हे 74,022.41 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत.

प्रवाशांना दिलासा, विमान प्रवास होणास स्वस्त; जेट फ्यूलच्या दरात कपात
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 2:20 PM

नवी दिल्ली : विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे, सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गुरुवारी एव्हीएशन टर्बाइन ऑईल फ्यूल (ATF) किमतीमध्ये कपात केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये जेट फ्यूलचे दर हे 74,022.41 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत. दरम्यान जेट फ्यूलमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे हवाई प्रवास स्वस्त होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात सुरू असलेल्या विमान कंपन्यांना देखील या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.  

देशातील प्रमुख शहरातील किमती

इंडियन ऑईलने जेट फ्यूलमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजापासून नवे दर लागू झाले आहेत. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये फ्यूलचे दर हे 74,022.41 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत. कोलकातामध्ये जेट फ्यूलचा भाव प्रति किलोलीटर हा 78,215.01 रुपये एवढा आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एक किलोलीटर फ्यूलसाठी सर्वात कमी  72,448.20 रुपये मोजावे लागत आहेत. तर चेन्नईमध्ये जेट फ्यूलचा दर 76,197.80 रुपये प्रति किलोलिटर एवढा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील काही प्रमाणात दर खाली आल्याचे दिसत असून, त्याचाच परिणाम म्हणून भारतामध्ये फ्यूलच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

विमान कंपन्यांना दिलासा 

भारतामध्ये जेट फ्यूलचे दर कमी करण्यात आले आहेत, याबाबत बोलताना एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जेट फ्यूलचे दर कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये फ्यूलच्या दरात 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटले होते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोना संकट आहे. कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती.  याचा मोठा फटका हा विमान प्रवासी वाहतूक कंपन्यांना बसला आहे. मात्र या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

संबंधित बातम्या 

प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण

Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.