Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : ट्विटरची झूल हटवली, आता एलॉन मस्क करणार जोरदार बॅटिंग

Elon Musk : ट्विटरच्या सीईओ पदावरुन एलॉन मस्क पायउतार होत आहे. मस्कला त्याच्या या प्रकल्पासाठी वेळ मिळत नसल्याने त्याने हे पाऊल टाकले आहे. काय आहे त्याचा पुढचा प्लॅन

Elon Musk : ट्विटरची झूल हटवली, आता एलॉन मस्क करणार जोरदार बॅटिंग
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 10:51 AM

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यापासून वाद आणि टीका एवढेच ते काय समीकरण उरले होते. मस्कने कमान संभाळल्यापासून ट्विटरची मोठी पडझड झाली. या कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आणि कुशल मनुष्यबळ गमवावे लागले. ट्विटरची कमान आता महिलेच्या हाती देण्यात येत आहे. पहिल्यांदाच ट्विटरचे नेतृत्व (Twitter New CEO) एक महिला करणार आहे. लिंडा याकारिनो ट्विटरचे नेतृत्व करणार आहे. मस्क पायउतार होत असले तरी त्यांच्याकडे ट्विटरचे कार्यकारी अध्यक्षपद आणि इतर जबाबदाऱ्या असतील. पण मस्क आता या प्रकल्पासाठी पूर्णवेळ देणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याला मोठा फायदा होऊ शकतो.

मस्क याने सांगितला प्लॅन एलॉन मस्कने शनिवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, लिंडाकडे ट्विटरची जबाबदारी सोपविल्यानंतर त्याला टेस्लाच्या विस्तारासाठी आणि इतर प्रकल्पासाठी मोठा वेळ मिळणार आहे. टेस्ला सध्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जात आहे. टेस्लाची सर्वप्रकारची मिळकत 2023 च्या पहिल्या तिमाहीत 24 टक्क्यांनी घसरुन 2.7 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारावर लक्ष मस्क आता इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारावर लक्ष केंद्रीत करणार आहे. सध्या बाजारात मस्कने धडाका लावला आहे. टेस्ला बाजारात प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वस्तात ईव्ही देत आहे. किंमतीत कपातीचे धोरण सुरुच आहे. त्यामुळे बाजारातील तीव्र स्पर्धेत टेस्लाने बाजी मारली आहे. आता ईव्ही मार्केट जगभर पसरविण्याची योजना आहे.

हे सुद्धा वाचा

सायबरट्रक पडणार बाहेर सायबरट्रकची ग्राहकांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. मस्कने याविषयीची घोषणा केली. टेस्ला 2023 मधील तिसऱ्या तिमाहीत सायबरट्रक बाजारात उतरवणार आहे. इतर कारपेक्षा या कारची बांधणी आणि फिचर्स हटके असल्याचा दावा टेस्लाने केला आहे. त्यामुळे बाजारात या उत्पादनाविषयी आकर्षण आहे. टेस्लाचा महसूल 19.9 दशलक्ष डॉलरवर पोहचला आहे. वार्षिक आधारावर त्यात 18 टक्के वृद्धी दिसून आली.

टेस्लाचा महसूल घसरला ट्विटरपेक्षा मस्क याला खरी चिंता टेस्लाची लागलेली होती. कारण मार्च तिमाहीत कंपनीला जोरदा प्रदर्शन करता आले नाही. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के कमी रोखीचा व्यवहार केला. ईव्ही उत्पादनाला उठाव मिळावा यासाठी कंपनीने ईव्हीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घटविल्या. कारण यावर्षाच्या सुरुवातीला किंमतींपेक्षा ईव्ही मार्केटमध्ये उत्पादनांना मागणी नव्हती. त्यांचा स्टॉक 60 टक्क्यांनी पडला होता. पण आता मस्क टेस्लाकडे लक्ष देणार आहे. ईव्हीच्या किंमती वाढविण्याचे संकेत पण मस्क यांनी दिले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.