ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची; नव्या वर्षात मोबाईल यूजर्संना लागणार शॉक! कॉलिंग आणि डेटासाठी द्यावे लागणार ज्यादा पैसे?

मोबाइलवर बोलणे आणि इंटरनेट वापरणे आता महाग होणार आहे.

ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची; नव्या वर्षात मोबाईल यूजर्संना लागणार शॉक! कॉलिंग आणि डेटासाठी द्यावे लागणार ज्यादा पैसे?
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 5:32 PM

दिल्ली : मोबाइलवर बोलणे आणि इंटरनेट वापरणे आता महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्या नवीन वर्षामध्ये त्यांच्या प्री-पेड आणि पोस्टपेड दोनीही प्लॅनच्या किंमती वाढ करण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 13% महसूल वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. कारण सरासरी महसूल (ARPU) आणि डेटा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत इंफॉर्मेशन एॅड क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरएच्या अहवालानुसार टेलिकॉम कंपन्यांमार्फत मोबाईलच्या रिचार्जचे दर वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. (Will have to pay more for calling and data in 2021)

रिचार्ज महाग होण्याचे कारण काय आयसीआरएच्या अहवालानुसार येत्या काळात टेलिकॉम सेवेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. कारण बरेच जण वर्क फ्राम होम करत आहे आणि यामुळे डेटाचा वापर जास्त होत आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून अधिक डेटा आणि कॉलिंगचा वापर होत असल्यामुळे रिचार्जच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी शुल्क वाढविले होते. यामुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये दूरसंचार कंपन्यांची चांगली कमाई झाली.

कर्ज वाढण्याची शक्यता आयसीआरए एजन्सीनुसार टेलिकॉम कंपन्यांचे कर्ज देखील कमी होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2021 मध्ये टेलिकॉम उद्योगाचे 4.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज असेल. आर्थिक वर्ष 2022 मध्ये दूरसंचार उद्योगाचे अंदाजे 4.7 लाख कोटी कर्ज असेल. टेलिकॉम क्षेत्रात सरकार मदत करू शकते. नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने आर्थिक मदतीची ऑफर दिली होती.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांमुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. अधिक माहितीनुसार, 1 जानेवारीपासून चेक देताना होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली, भारतभरातील सर्व चारचाकी वाहनांसाठी अनिवार्य एफएएसटीएग आणि छोट्या व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) रिटर्न भरण्यासाठी नवीन सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे नवीन नियम लागू होण्यापूर्वी त्याविषयी तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या : 

दिवसाला कमवाल 4000 रुपये, नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय

अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी गर्दी, 70 कंपन्या सरसावल्या

New Year ला आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, 1 जानेवारीपासून होणार पगार वाढ

(Will have to pay more for calling and data in 2021)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.