Chandrayaan-3 : चला, चंद्रावर बांधुयात का बंगला? या भारतीयांनी तर अगोदरच घेतलाय प्लॉट
Chandrayaan-3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरुन भारताने भीम पराक्रम केला. चंद्रामुळे भारताच्या मून इकॉनॉमीला मोठा बुस्ट मिळणार आहे. चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहे. काही लोकांनी तर चंद्रावर जमीन सुद्धा खरेदी केली आहे.
नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : या वेळी भारत, चंद्र आणि चंद्रयान-3 (Chandrayaan-3 Successful Landing) ही दोन शब्द सगळ्याच सर्च इंजिनावर सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने, इस्त्रोने (ISRO) बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06:04 वाजता हा भीम पराक्रम केला. यशस्वीपणे चंद्रयान-3 चंद्राच्या जमिनीवर उतरले. संपूर्ण जगात अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर चढाई करणारा भारत हा जगातील अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला आहे. तर दक्षिण ध्रुवावर (South Pole Of Moon) उतरणारा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहे. त्यात या भारतीयांचे नाव आघाडीवर आहे. 2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत, 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील, असा अंदाज आहे.
या भारतीयांनी खरेदी केली चंद्रावर जमीन
आता चंदामामा दूर का राहिला नाही. चंद्रावर मानवाने चढाई केली आहे. अमेरिकन अंतराळवीर तर चंद्रावर पोहचलेले आहेत. चंद्रावर रिअल इस्टेट यापूर्वीच सुरु झाली आहे. चंद्राच्या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी अनेकांमध्ये शर्यत लागलेली आहे. जगातीलच नाही तर देशातील काही जणांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
गेल्यावर्षीच केली खरेदी
2022 मध्येच याविषयीचे वृत्त झळकले होते. त्यानुसार, त्रिपुरा राज्यातील शिक्षक सुमन देबनाथ यांनी इंटरनॅशनल लूनर सोसायटीकडून चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली. त्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल लूनर सोसायकडे रीतसर नोंदणी केली होती. नोंदणी आधारे काही हजारात त्यांनी जमीन खरेदी केली. या वृत्तानुसार, 6000 रुपयांमध्ये त्यांनी ही जमीन खरेदी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची पण जमीन
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने पण त्याच्या मृत्यूपूर्वी चंद्रावर जमीन खरेदी केली होती. 2018 मध्ये जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यांनी चंद्रावरील ‘सी ऑफ मसकोवी’ या भागात जमीन खरेदी केली होती. शाहरुख खान यांना पण त्यांच्या काही चाहत्यांनी चंद्राची जमीन भेट दिल्याचे सांगितले.
हैदराबाद आणि बंगळुरुमधील रहिवाशांची जमीन
हैदराबाद आणि बंगळुरुमधील काही रहिवाशांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. 2002 मध्ये हैदराबाद येथील राजीव बागडी आणि 2006 मध्ये बंगळुरुमधील ललित मोहता यांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा केला होता. लूना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री यांच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कशी होते जमीनीची खरेदी?
चंद्रावर जमीन खरेदीसाठी लूना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूरन लँड्स रजिस्ट्रीद्वारे जमीन खरेदी करता येते. या नियमानुसार, चंद्रावर कमीत कमी एक एकर जमीन खरेदी करता येऊ शकते. त्यासाठी 37.50 अमेरिकन डॉलर म्हणजे 3112.52 रुपयांचा खर्च येतो.
या गोष्टी ठेवा ध्यानात
- 1967 मधील आऊटर स्पेस ट्रीटीनुसार चंद्रावरील जमिनीवर कोणत्याही एका देशाचा अधिकार नाही.
- या करारावर जगातील 110 देशांनी हस्ताक्षर केले आहेत.
- ब्रह्मांड संपूर्ण मानवाचे आहे. ग्रह-उपग्रहावरील जमिनीवरील मालकी हक्क एका व्यक्तीला देता येणार नाही.
- लूना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री जमीन विक्री करत आहे.