Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्समधील गुंतवणूक आताच फायद्याची? अजून उसळी घेईल का शेअर

Mukesh Ambani : रिलायन्स समूहात नवीन कंपनीचा उदय होत आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFS) ही कंपनी बाजारात सूचीबद्ध होत आहे. यामधील गुंतवणूक किती फायदेशीर ठरेल? का गुंतवणूकदारांनी थोडी वाट पहावी.

Mukesh Ambani : रिलायन्समधील गुंतवणूक आताच फायद्याची? अजून उसळी घेईल का शेअर
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 3:24 PM

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्संमध्ये सोमवारी जोरदार तेजी दिसून आली. रिलायन्सच्या शेअरने 2700 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र आहे. रिलायन्स स्ट्रॅट्रेजिक इन्व्हेसमेंट्स लिमिटेडच्या (RSIL) विलिगिकरणाचा हा परिणाम आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आरएसआयएलचे विलिगिकरण करणार आहे. त्यासाठी 20 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. एनर्जी ते टेलिकॉम सेक्टरमधील शेअर्समध्ये 52 आठवड्यातील नवीन उच्चांक 2,755 रुपयांचा उच्चांक गाठला.

10 टक्के येणार तेजी दलाल स्ट्रीटच्या तज्ज्ञांनुसार, मार्च 2024 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 10 टक्के तेजी दिसेल. सोमवारी दुपारी 2.50 वाजता हा शेअर जवळपास 4 टक्क्यांनी वधारला. या शेअरची किंमत 2,736.10 रुपयांवर पोहचला. तर बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स 99.17 अंक म्हणजे 0.15 टक्क्यांनी वाढून 65,397.62 अंकावर पोहचला. या आर्थिक वर्षात 10 जुलैपर्यंत कंपन्यांच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची तेजी दिसून आली.

किती आहे भागभांडवल नव्याने सूचीबद्ध होत असलेल्या कंपनीचे एकूण भागभांडवल जवळपास 1,50,000 कोटी रुपये असेल. त्यामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे असतील. उर्वरीत रक्कम तिचे मुळ भांडवल असेल. या सेक्टरमधील मोठी कंपनी बजाज फायनान्सचा त्यामानाने व्यवसाय फार मोठा आहे. ही NBFC वित्तीय सेक्टरमधली मोठी कंपनी आहे. तिचे एकूण भांडवल जवळपास 44,000 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

शेअर घेणार मोठी उसळी बिझनेस टुडेच्या एका बातमीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरबद्दल बाजारात भाकीते वर्तविण्यात येत आहे. विविध तज्ज्ञ या शेअरबाबत त्यांचे विचार मांडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पुढील वर्षात मार्च महिन्यात 3,000-3100 रुपयांपर्यंत झेप घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्स रिटेल, जिओ आयपीओ आणि ग्रीन एनर्जीसंदर्भात येत्या काही दिवसांत अनेक खुलासे होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

या क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा JFSL आता व्यापारी, ग्राहकांना कर्ज पुरवठा करु शकेल. त्यासाठी तरल संपत्ती कंपनीकडे असेल. येत्या तीन वर्षांत कंपनी कर्जासोबतच विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग, एसेट मॅनेजमेंटमध्ये सेवा पुरवणार आहे. ग्राहकांना नवनवीन ऑफर्स मिळतील. बजाज फायनान्सला येत्या काही वर्षात मोठा स्पर्धक तयार होऊ शकतो.

शेअरधारकांना लॉटरी या विलिगीकरणाचा शेअरधारकांना मोठा फायदा होईल. त्यांना रेकॉर्ड तारखेनंतर त्यांच्या डिमॅट खात्यात जिओ फायनेन्शिअलचे स्टॉक मिळतील. हा बोनस ठरु शकतो. हे शेअर वधारल्यावर गुंतवणूकदार मालामाल होतील.

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.