करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा

म्युच्युअल फंडामध्ये 20 वर्ष गुंतवणूक केल्यास 1 कोटी रुपये मिळू शकतात. (Mutual Funds Investment after forty years of age)

करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 12:41 PM

मुंबई : तुम्ही वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत आणि तुम्हाला पुढील 20 वर्षात करोडपती व्हायचं असेल तर तुमच्यापुढे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा पर्याय उपलब्ध आहे. योग्य पद्धतीनं पुढील 20 वर्षे गुंतवणूक केली तर निवृत्तीच्या वयापर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास योग्य रक्कम मिळू शकते. वयाची 60 वर्षे पूर्ण होत असताना 1 कोटींपर्यत रक्कम मिळू शकते.(Mutual Funds Investment after forty years of age)

20 वर्षात कसे होणार करोडपती?

करोडपती व्हायचे असल्यास सलग 20 वर्षे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी लागेल. यासाठी दर महिन्याला किमान 9 हजार रुपये गुंतवावे लागतली. 20 वर्षानंतर साडे बारा टक्क्यांच्या हिशोबानुसार आपल्या फंडाची रक्कम 1 कोटी होईल. मात्र, गेल्या वर्षांमध्ये काही इक्विटी फंडसने मागील 20 वर्षांच्या कालावधीत 20 टक्के प्रतिवर्षच्या हिशोबानुसार सीएजीआर रिटर्न दिले आहेत. अशा प्रकारच्या फंडमध्ये 10 हजार दर महिन्याला गुंतवणूक केल्यास 2 कोटी रुपये मिळू शकतात. (Mutual Funds Investment after forty years of age)

गुंतवणूक करण्यापूर्वीची दक्षता

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य फंडची निवड करणे आवश्यक आहे. छोट्या स्वरुपात गुंतवणूक करणाऱ्यांपुढे योग्य फंड निवडण्याचे आव्हान असते. कारण योग्य म्युच्यअल फंडची निवड करण्यासाठी खूप माहिती घ्यावी लागते. यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करणे गरजेचे आहे. कोणत्याही स्वरुपाची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीवर अवलंबून असतात. (Mutual Funds Investment after forty years of age)

नियमित गुंतवणूक गरजेची

आजच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये म्युच्युअल फंडातून लोकांना चांगले पैसे मिळाले आहेत. काही लोकांनी 20 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि ते आज करोडपती झाले आहेत.

भारतात गुंतवणुकीचा विचार करण्यास उशीर

गुंतवणूक सुरु करण्यासाठी वयाची मर्यादा नसते मात्र, भारतात साधारणपणे गुंतवणुकीचा विचार करण्यास लोक वयाच्या 40 व्यावर्षी सुरुवात करतात. यावेळी गुंतवणूक कुठे आणि कशा स्वरुपात करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

काही वेळा छोट्या स्वरुपात केलेली गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देते. यासाठी काही जण म्युच्युअल फंडचा पर्याय निवडतात. 40 व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करुनही म्युच्युअल फंडाद्वारे चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी म्युच्युअल फंडात योग्य स्वरुपात गुंतवणूक करणं आवश्यक आहे. (Mutual Funds Investment after forty years of age)

संबंधित बातम्या :

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, सोमवारपासून लागू होणार नवा नियम

महिन्याला 1 रुपयात मिळवा घसघशीत फायदा, जबरदस्त आहे सरकारची ही योजना

आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये

(Mutual Funds Investment after forty years of age)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.