ATM मधून पैसे काढणे आणि डेबिट-क्रेडिट कार्डावरील शुल्कात लवकरच वाढ, जाणून घ्या RBI च्या सूचना

'मिंट'च्या अहवालात म्हटले आहे की, आता ही इंटरचेंज फी एटीएम बसविणार्‍या बँक आणि कंपन्या-एजन्सी यांच्यात वादाचे मूळ बनलेय.

ATM मधून पैसे काढणे आणि डेबिट-क्रेडिट कार्डावरील शुल्कात लवकरच वाढ, जाणून घ्या RBI च्या सूचना
एटीएम
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 8:41 PM

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे बँका एटीएम व्यवहारांवर आकारू शकणारी इंटरचेंज फी वाढविलीय. आर्थिक व्यवहारावरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आलीय. आर्थिक वाढीव व्यवहारांवरही ही वाढ झाली असून, ती पाच रुपयांवरून 6 रुपयांवर केली गेली. हा नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी बँका मर्चेंटकडून घेतात. हे मर्चेंट असे आहेत, जे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे रक्कम घेतात. ‘मिंट’च्या अहवालात म्हटले आहे की, आता ही इंटरचेंज फी एटीएम बसविणार्‍या बँक आणि कंपन्या-एजन्सी यांच्यात वादाचे मूळ बनलेय.

एटीएम रोख पैसे काढण्याचे नियम बदलले

आरबीआयने म्हटले आहे की, कोणताही ग्राहक एटीएममधून 5 मोफत व्यवहारांची सुविधा घेऊ शकतो. यात आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश आहे. ही सुविधा मासिक मर्यादा आहे, जी केवळ आपल्या बँकेच्या एटीएममधूनच घ्यावी लागते. आपण इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढू शकता, परंतु त्याची मर्यादा फक्त 3 व्यवहारापर्यंत आहे. तीन मेट्रो शहरांमध्ये आणि पाच बिगर मेट्रो शहरांमध्ये

मोफत व्यवहार सुविधा देण्याचा नियम

जर आपण त्याहून अधिक व्यवहार केला, तर प्रति पैसे काढण्यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यात वाढ करण्याचेही जाहीर करण्यात आले असून, 1 जानेवारी 2022 पासून ते 21 रुपये होईल. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इंटरचेंज फी आणि बँकांच्या सर्वसाधारण खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना ग्राहकांचा प्रति व्यवहार 21 रुपये कमी करण्याची परवानगी देण्यात आलीय. ही फी 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

रोख पैसे काढणे आणि चेक बुक शुल्क

आयसीआयसीआय बँकेने रोख व्यवहाराच्या नवीन नियमांबाबत आपल्या ग्राहकांना नोटीसही बजावलीय. यामध्ये एटीएम इंटरचार्ज आणि चेक बुक शुल्काबाबतही माहिती देण्यात आलीय. हा सुधारित शुल्क घरगुती बचत खातेधारक तसेच पगाराच्या खात्यावर लागू होईल. हा नवा नियम 1 ऑगस्टपासून अंमलात येणार आहे.

एसबीआयचा नवा नियम

स्टेट बँक एसबीआयने जुलै महिन्यात एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सर्व्हिस शुल्कामध्ये बदल केला. बेसिक सेव्हिंग्ज बँक खात्यातून महिन्यात एटीएम किंवा शाखेतून 4 हून अधिक व्यवहार झाले तर त्याचे पैसे आकारले जातील. आता एसबीआय ग्राहकांना केवळ 10 पृष्ठांचे चेकबुक विनामूल्य मिळतील. जर आपण त्यापेक्षा जास्त पैसे घेतले तर आपल्याला फी भरावी लागेल. हा नियम 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय.

प्रत्येक ग्राहकाला 10 पानांचे चेकबुक विनामूल्य मिळणार

नवीन नियमात असे म्हटले आहे की, एसबीआयतर्फे आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक ग्राहकाला 10 पानांचे चेकबुक विनामूल्य दिले जाईल. ही सुविधा मूलभूत खातेदारांनादेखील लागू असेल. 10 पानांचे चेकबुक संपल्यानंतर ग्राहकाला ते स्वतंत्रपणे घ्यायचे असेल तर 40 रुपये अधिक जीएसटी देऊन तुम्हाला 25 पानांचे चेकबुक मिळू शकेल. ही किंमत जवळपास 75 रुपयांवर येईल. एखाद्या ग्राहकाला आपत्कालीन चेक बुक हवा असेल तर त्याला जीएसटी व्यतिरिक्त 50 रुपये द्यावे लागतील.

संबंधित बातम्या

IRCTC News: ट्रेनमध्ये रिक्त बर्थ असल्यास आता मोबाईलवर येणार मेसेज, कन्फर्म तिकीट मिळालेच म्हणून समजा

पेट्रोल आणि डिझेलसंदर्भात लवकरच मोठा दिलासा, किंमत किती होणार?

Withdrawals from ATMs and debit-credit card charges will increase soon

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.