डब्यात पैसे साठवणाऱ्या महिला आज म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये खेळतात, पुरुषांनाही ‘असं’ टाकलं मागे
या सर्वेक्षणात असे दिसून आले की, महाराष्ट्रातील महिला गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत संतुलित निर्णय घेतात.
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या गुंतवणुकीच्या सवयी, त्यामागील उद्दिष्टे आणि सामान्यत: संपत्ती निर्माण करण्याचा त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्याच्या उद्देशाने भारतातील अग्रगण्य गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘ग्रो’ (Groww) ने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असे दिसून आले की, महाराष्ट्रातील महिला गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत संतुलित निर्णय घेतात. बहुतांश 54% महिलांनी वैयक्तिक ध्येय पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक सुरू केल्याचे सांगितले. (women lead in the country to support the family 54 percent of women save money in Mutual funds)
वैयक्तिक उद्दिष्टांव्यतिरिक्त 44% महिलांनी कुटुंबाला आधार म्हणून गुंतवणूक करत असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील 29% महिला गुंतवणूकदार पर्यटनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीही गुंतवणूक करतात. या सर्वेक्षणात देशभरातील 28,000 महिलांनी त्यास प्रतिसाद दिला. यापैकी सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील असून येथील 25 % महिलांनी प्रतिसाद दिला. तसेच, प्रतिसाद दिलेल्या एकूण महिलांपैकी 10 % महिला मुंबईतील तर 5 % महिला पुण्यातील होत्या.
बहुतांश महिला स्टॉक्स (60%) आणि म्युच्युअल फंड (81%) अशा हाय रिस्क असलेल्या जास्त परतावा असलेल्या मालमत्ता वर्गांची निवड करतात. तर महिलांचा एक मोठा गट एफडी (30%), सोने (28%) आणि पीपीएफ (23%) या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो.
गुंतवणुकीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील महिला गुंतवणुकदार बऱ्यापैकी स्वतंत्र असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले. सर्वाधिक 35% महिलांनी सांगितले की, गुंतवणुकीविषयी ते आपल्या परिजनांशी संवाद साधतात, मात्र याबाबतीतला निर्णय त्यांचा असतो. कुठे आणि कशी गुंतवणुक करायची, हे त्या ठरवतात. त्यापैकी 18% महिलांनी सांगितले की, त्यांचे आर्थिक व्यवस्थापन त्या स्वतंत्रपणे हाताळतात आणि गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे घेतात.
या निरीक्षणातून असे दिसून आले की, महिला केवळ एका दृष्टीकोनावर आधारीत गुंतवणूक करत नाहीत तर त्या संतुलित आणि उद्दिष्ट आधारीत मानसिकतेतून गुंतवणूक करतात. निर्णय क्षमतेत त्या अधिक स्वतंत्र असून त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोखीम-परताव्यातील खाचखळग्याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे.
महिलांना मागे खेचणारे घटक कोणते?
राष्ट्रीय पातळीवर, सर्वेक्षणात असे दिसून आले की, 2000 महिला गुंतवणूक करत नाहीत. त्यापैकी 49% म्हणाल्या की, गुंतवणुकीचे ज्ञान नसल्यामुळे त्या याकडे वळत नाहीत. तर 32% महिला म्हणाल्या की, त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठीची पुरेशी बचत नाही. 13% महिलांना मार्केटमध्ये पैसा गमावण्याची भीती वाटते. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याकरिता गुंतवणुकीबाबतीत शिक्षण आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
आर्थिक उत्पादने आणि लोकांना सहजपणे गुंतवणूक करता यावी, यासाठी उपलब्ध झालेल्या विविध अॅपमुळे सर्व लिंग आणि उत्पन्न गटातील लोकांनी गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व्हेतील 25% महिला म्हणाल्या की, ऑनलाइन आर्थिक कंटेंट आल्याने गुंतवणुकीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले. 22% महिला म्हणाल्या की, ग्रो सारख्या गुंतवणूक अॅपमुळे त्या गुंतवणुकीच्या प्रवासाकडे वळाल्या.
ग्रोचे सीईओ ललित केशरे म्हणाले, ‘सर्वेक्षणातील सकारात्मक निरीक्षण म्हणजे, गुंतवणूक करणाऱ्या महिलांपैकी बहुतांश महिला स्वत:च निर्णय घेतात. त्यापैकी बऱ्याच जणी त्यांच्या आर्थिक पसंतीविषयी कुटुंबातील सदस्य, जोडीदारांशी चर्चा करतात, पण अखेरीस निर्णय त्यांचा असतो. त्यामुळे अगदी महिलांच्या संपत्ती व्यवस्थापनातही मुख्य निर्णय पुरुषांचा असतो, या पूर्वग्रहामध्ये आता बराच बदल झालेला दिसतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान आम्ही महिला गुंतवणुकदारांना शून्य ब्रोकरेज आकारणार आहोत. (women lead in the country to support the family 54 percent of women save money in Mutual funds)
संबंधित बातम्या –
International Women’s Day! महिलांनो अडचणीत असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना
घर खरेदी करायचे आहे, मग ही आहे योग्य संधी, या बँकांनी केली गृहकर्ज व्याजदरात कपात
Gold rate today : गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 12 हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा ताजे दर
(women lead in the country to support the family 54 percent of women save money in Mutual funds)