प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. खासकरून लेकीची. यामुळेच मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) सध्या लोकप्रिय ठरत आहे.
सुकन्या समृध्दी खातेदारांनी 10 दिवसात पूर्ण करा हे काम
जास्तीत-जास्त किती रक्कम जमा कराल? - सुकन्या समृद्धि खातं हे तुम्ही तुमच्या दोन मुलींच्या नावे उघडू शकता.
एफडीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी योजना आजपासून सुरु, फक्त 5000 रुपयांपासून गुंतवणूक उपलब्ध
या खात्यात 15 वर्षे पैसे जमा केले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकन्या समृद्धि योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज दर मिळतो.
सुकन्या समृद्धि योजनेतून पैसे काढण्याचे नियम - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खातं बंद केलं जाऊ शकत नाही किंवा मुलीचं वय 18 वर्ष होण्यापूर्वी गुंतवणूक केलेले पैसे काढता येणार नाहीत.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तुम्ही दोन अटींवर 50 टक्के पैसे काढू शकता. पहिली म्हणजे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि दुसरी म्हणजे तिच्या लग्नाची आर्थिक गरज.