कामगारांचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, ICICI होम फायनान्सकडून ऑन-द-स्पॉट कर्जाची सुविधा
कंपनीने म्हटले आहे की, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टेलर, चित्रकार, ऑटो मेकॅनिक, ऑटो, टॅक्सी ड्रायव्हर आणि इतर केवळ ऑन-द-स्पॉट या योजनेंतर्गत गृहकर्ज घेऊ शकतात. त्यांना फक्त त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सहा महिन्यांच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल.
नवी दिल्ली : आयसीआयसीआय होम फायनान्सने काम करणाऱ्या कामगार आणि मजुरांना गृहकर्ज देण्याची योजना सुरू केलीय. ज्यांच्याकडे आयकर परतावा दस्तऐवज नाही, त्यांच्यासाठी हे कर्ज उपलब्ध असेल. अशा व्यक्तींसाठी आयसीआयसीआय होम फायनान्सने ऑन द स्पॉट सरल होम लोन सुविधा सुरू केली.
‘बिग फ्रीडम मंथ’अंतर्गत विशेष योजना सुरू
कंपनीने असे म्हटले आहे की, त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘बिग फ्रीडम मंथ’अंतर्गत अशा लोकांसाठी ही योजना सुरू केलीय. कंपनीने म्हटले आहे की, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टेलर, चित्रकार, ऑटो मेकॅनिक, ऑटो, टॅक्सी ड्रायव्हर आणि इतर केवळ ऑन-द-स्पॉट या योजनेंतर्गत गृहकर्ज घेऊ शकतात. त्यांना फक्त त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सहा महिन्यांच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल.
विविध गृहकर्जाच्या ऑफर
आयसीआयसीआय होम फायनान्सचे एमडी आणि सीईओ अनिरुद्ध कमानी म्हणाले, “ स्वातंत्र्य महिन्यादरम्यान ऑन-द-स्पॉट होम लोन मंजुरीच्या स्वरूपात विविध प्रकारचे गृहकर्ज ऑफर करण्यात आलेत. आमच्याकडे प्रत्येक शाखेत स्थानिक प्रतिनिधी असतील, जे किमान कागदपत्रांसह कर्ज प्रदान करण्यात मदत करतील. ”
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतही अनुदान
कंपनीने सांगितले की, या योजनेमध्ये गृहकर्जधारक प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) अंतर्गत व्याज रकमेमध्ये 2.67 लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. कमी उत्पन्न गटासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही कर्ज संलग्न सबसिडी योजना आहे.
SBI कडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी होम लोनवर विशेष ऑफर
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या (75th Independence Day) निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना भाड्यातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी गृह कर्जावर (Home loan) शून्य प्रक्रिया शुल्कची ऑफर देत आहे. एसबीआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले, ” या स्वातंत्र्य दिनी तुमच्या स्वप्नांच्या घरात पाऊल टाका, आता शून्य प्रोसेसिंग फीसह होम लोनसाठी अर्ज करा. या व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI कडून महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत सुविधेचा लाभ दिला जात आहे. गृहकर्ज सुविधेंतर्गत महिलांना व्याजदरात 5 बेसिस पॉइंटच्या सूटचा लाभ दिला जात आहे.
संबंधित बातम्या
तुम्हाला 1 लाखाचे भाग्यवान विजेते होण्याचा मेसेज मिळाल्यास सावधान, PNB कडून अलर्ट जारी
SBI कडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी होम लोनवर विशेष ऑफर, अर्ज कसा करावा ते जाणून घ्या
Workers dream of buying a house will come true, on-the-spot loan facility from ICICI Home Finance