Inflation : जगात महागाईची लाट, पण भारताचा नंबर कितवा माहिती आहे का?

Inflation : महागाईच्या नकाशावर भारताचा क्रमांक कितवा?

Inflation : जगात महागाईची लाट, पण भारताचा नंबर कितवा माहिती आहे का?
महागाईत नंबर कितवाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली : महागाईने (Inflation) भारतालाच (India) नाही तर जगाला (World) विळखा घातला आहे. महागाईच्या नकाशावर अख्खे जग आले आहे. पण या नकाशात भारताचा क्रमांक सर्वात वर लागतो की, सर्वात खाली? म्हणजे महागाईच्या झळात आपलाच देश जळतोय असं नाही, तर जगातील अनेक अर्थव्यवस्था (Economy) भरडल्या जात आहेत. या जागतिक क्रमंवारीत काय आहे भारताची स्थिती ते पाहुयात..

पण सांख्यिकीचा आधार घेतला तर महागाईच्या क्रमवारीत भारत सर्वात खालच्या टोकावर आहे. पण त्याने लागणाऱ्या झळा थोड्याच कमी होणार आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

पण आकडेवारी काय सांगते, ते पाहुयात. वर्ल्ड ऑफ स्टॅटेटिक्सच्या (World of Statistics) आकडेवारीत भारत इतर देशांच्या मानाने सुखात असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

वार्षिक महागाईच्या आकड्यांवरुन हा चढता-उतरता आलेख काढण्यात आला आहे. तर जगात महागाईचे सर्व रेकॉर्ड तुर्की आणि अर्जेंटिना या देशात मोडल्या गेले आहेत. या अर्थव्यवस्था महागाईने मेटाकुटीला आल्या आहेत.

तुर्कीतील महागाई दर 83.4 टक्क्यांवर पोहचला आहे. तर त्यानंतर क्रमांक लागतो तो अर्जेंटिना या देशाचा. या देशात महागाई दर 83 टक्क्यांवर पोहचला आहे. अर्थात हे आकडे वार्षिक आहेत.

महागाईने अमेरिकेपासून सर्व विकसीत राष्ट्रांना बेजार केले आहे. तुर्की आणि अर्जेटिंना नंतर क्रमांक लागतो तो नेदरलँडचा. येथे महागाईचा दर 14.5 टक्के तर रुसमध्ये 13.7 टक्के महागाई दर आहे.

इटली या देशात महागाईचा दर 11.9 टक्के तर जर्मनी या देशात महागाईचा दर 10.4 टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनचा क्रमांक लागतो. जगावर राज्य केलेल्या या देशात महागाई दर 10.1 टक्के आहे.

भारत या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. देशात महागाईचा दर 7.4 टक्के आहे. भारताच्या अगोदर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. या दोन्ही देशात अनुक्रमे 8.2, 7.5 टक्के महागाई दर आहे.

Top 10 च्या यादीबाहेर, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रांस, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या देशांचा क्रमांक लागतो. या देशात 7.3 ते 5.6 या दरम्यान महागाई दर आहे.