जगातील सर्वाधिक महागडा सेन्सेक्स: 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न

लसीकरण कार्यक्रमाला गती आणि अर्थव्यवस्था वाढीच्या निर्देशासह वर्षाला सुरुवात झाली. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रतेचा देखील सामना करावा लागला. कमी व्याज दर, गुंतवणुकीसाठी पर्याप्त उपलब्धता तसेच रिअल इस्टेटने टाकलेली कात या कारणांमुळे बाजारात तेजी नोंदविली गेल्याचे निरिक्षण आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

जगातील सर्वाधिक महागडा सेन्सेक्स: 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न
SENSEX
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:37 PM

नवी दिल्ली- कोविड प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेची चक्र मंदावली होती. भारतीय शेअर बाजारने वर्ष 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी नोंदवत सर्वोत्तम रिटर्न प्राप्त झाले. अनेक कंपन्यांच्या मूल्यांकनात अधिकतम वाढीसोबत चिंताजनक परिस्थितीही दिसूध आली. तेजी आणि घटीच्या चक्रात अडकलेल्या अर्थव्यवस्थेत मात्र शेअर बाजार निर्देशांकात समाधानकारक स्थिती दिसून आली. देशातील सर्व यादीत समावेशित शेअर्सचे एकूण मूल्यांकन 72 लाख कोटी रुपयांनी वाढून 260 लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशंकाने यावर्षी पहिल्यांदाच 50,000 अंकाना पार करत इतिहास रचला आणि पुढील सात महिन्यांत 60,000 चा टप्पा देखील ओलांडला. निर्देशंकाने 18 आॕक्टोबरला सर्वाधिक अंकावर 61,765.59 वर बंद झाला. कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’चा प्रादूर्भाव शेअर मार्केटवर दिसून आला. शेअर बाजार निर्देशंकात घसरण नोंदविली गेली. वित्तीय वर्षात गुंतवणूकदारांना 20 टक्के रिटर्न प्राप्त झाला.

जगातील सर्वात महाग सेंन्सेक्स!

जगातील सर्व बाजारांच्या तुलनेत सेंन्सेक्स सर्वाधिक महाग आहे. ज्याचा प्राईस टू अर्निंग रेशिओ 27.11 आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना सेंन्सेक्स कंपन्यांना भविष्यातील कमाईच्या प्रत्येक रुपयासाठी 27.11 रुपये देय करावे लागतात. मागील 20 वर्षांची सरासरी टक्केवारी 19.80 आहे. केवळ भारतीय बाजारात उलाढालीला गती नसून जगभरातही गुंतवणुकीचा ओघ वाढतो आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या नेतृत्वात जागतिक बँकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

बाजारात तेजीचे कारण:

लसीकरण कार्यक्रमाला गती आणि अर्थव्यवस्था वाढीच्या निर्देशासह वर्षाला सुरुवात झाली. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रतेचा देखील सामना करावा लागला. कमी व्याज दर, गुंतवणुकीसाठी पर्याप्त उपलब्धता तसेच रिअल इस्टेटने टाकलेली कात या कारणांमुळे बाजारात तेजी नोंदविली गेल्याचे निरिक्षण आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

तज्ज्ञांचा अंदाज: भारतीय अर्थव्यवस्थेची नव्या वर्षात घौडदोड; महागाईचा चिंताजनक स्तर!

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.