Year Ender 2023 | या IPO ची या वर्षात जोरदार बॅटिंग, असा झाला फायदा
Year Ender 2023 | वर्ष 2023 आता संपत आले आहे. बाजारात गेल्या काही दिवसांत मोठी उलाढाल झाली. अनेक उच्चांक बाजाराने गाठले. या वर्षात इनिशिअल पब्लिक ऑफरिंगने बाजारात चांगली कमाई करुन दिली. त्यातील काही आयपीओंनी या 2023 वर्षांत मोठी कमाई करुन दिली. गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला. काहींना तर छप्परफाड कमाई करता आली.
नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : यंदा अनेक कंपन्यांनी त्यांचा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग, आयपीओ बाजारात उतरवला. त्यातील काहींनी तर गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली. हे स्टॉक नंतर मल्टिबॅगर ठरले. अवघ्या काही गुंतवणुकीत अनेक जण थोड्याच अवधीत लखपती झाले. यामध्ये डीएलएम, टाटा टेक्नॉलॉजीज, सॅन्को गोल्डसह इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी टॉप 10 मध्ये जागा मिळवली. त्यातील 5 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले. त्यांच्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरली.
- सायएंट डीएलएम- पहिल्या क्रमांकावर सायएंट डीएलएम हा आयपीओ आहे. यावर्षी 10 जुलै रोजी हा आयपीओ बाजारात दाखल झाला. बाजारात येताच त्याने 58 टक्क्यांची उसळी घेतली. या आयपीओची इश्यू प्राईस 265 रुपये प्रति शेअर होती. बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर शेअरमध्ये 145 टक्क्यांची तेजी दिसली. सध्या हा शेअर 616 रुपयांवर आहे. तर 52 आठवड्यातील उच्चांकी झेप 778.90 रुपये होती.
- टाटा टेक्नॉलॉजी- टाटा टेक्नॉलॉजी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आयपीओने बाजारात धुमाकूळ घातला. स्टॉक एक्सचेंजवर त्याला 140 टक्क्यांचा प्रीमियम मिळाला. या स्टॉकचा इश्यू 500 रुपये होता. 1200 रुपयांवर हा एनएसईवर सूचीबद्ध झाला. तर बीएसईवर हा स्टॉक 1199.95 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या शेअरमध्ये जवळपास 137 टक्क्यांची तेजी दिसली. तर 52 आठवड्यातील उच्चांकी झेप 1400 रुपये होती.
- ईएमएस लिमिटेड – ईएमएस लिमिटेडच्या शेअरने जबरदस्त रिटर्न दिले आहेत. हा आयपीओ कमाईत तिसऱ्या स्थानावर होता. 21 सप्टेंबर 2023 रोजी हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध झाला. त्याची किंमत 211 रुपये होती. इश्यू प्राईसपेक्षा हा स्टॉक 119 टक्क्यांनी उसळला.
- सिग्रेचर ग्लोबल (इंडिया) – या कंपनीचा स्टॉक सप्टेंबर 2023 मध्ये एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध झाला. कंपनीने 350 रुपये इश्यू प्राईस ठेवली होती. सध्या हा स्टॉक 800 रुपयांच्या मूल्यावर आहे. त्याने 52 आठवड्यातील 809.9 रुपयांची उच्चांकी उडी घेतली आहे.
- विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड – या स्टॉकने 104 टक्क्यांचा परतावा दिला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा स्टॉक 165 रुपयांच्या किंमतीवर सूचीबद्ध करण्यात आला होता. तर मुंबई स्टॉक एक्सचेंजवर हा आयपीओ 163.3 रुपयांवर सूचीबद्ध झाला.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update