Yes Bank तेजीचा स्टॉक, दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बँकेसाठी खुशखबर!

बीएसईवर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी येस बँकेचा शेअर 13.63 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार उघडताच येस बँकेचे शेअर 14.25 रुपयांवर पोहोचला. व्यवहारादरम्यान त्याला आणखी गती मिळाली.

Yes Bank तेजीचा स्टॉक, दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बँकेसाठी खुशखबर!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 12:13 PM

बाजाराच्या घसरणीनंतरही खासगी क्षेत्रातील येस बँकेचे (Yes Bank) शेअरने सोमवारी दमदार कामगिरी केली. मार्च तिमाहीत बँकेची आर्थिक कामगिरी जोरदार राहिली, त्यामुळे शेअर बाजाराला (Share Market) चांगली मदत झाली. यामुळे आज दिवसभराच्या व्यवहारात एका क्षणी येस बँकेचा (Yes Bank Share) हिस्सा 6 टक्क्यांपर्यंत वाढला. मात्र, ही कामगिरी, ही गती फार काळ टिकली नाही.बीएसईवर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी येस बँकेचा शेअर 13.63 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार उघडताच येस बँकेचा शेअर 14.25 रुपयांवर पोहोचला. व्यवहारा दरम्यान त्याला आणखी गती मिळाली.मार्च 2022 अखेर संपलेल्या तिमाहीत येस बँकेने 367 कोटी रुपयांचा बंपर नफा  कमावला.खासगी क्षेत्रातील या बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 नंतर प्रथमच पूर्ण वर्षात नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वीच मार्च 2021 च्या तिमाहीत येस बँकेला 3,788 कोटी रुपयांचा मोठा तोटा झाला होता.

दिवसभरातही शेअर वर चढला

बीएसईवर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी येस बँकेचा शेअर 13.63 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार उघडताच येस बँकेचे समभाग 14.25 रुपयांवर पोहोचले. व्यापारादरम्यान याला आणखी गती मिळाली, त्या आधारे एका क्षणी शेअरने सुमारे 6 टक्क्यांची उसळी घेत 14.51 रुपयांचा दिवसातील उच्चांक गाठला. व्यवहारादरम्यान तो 13.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवरही पोहोचला. अखेर येस बँकेचा शेअर 1.25 टक्क्यांनी वधारून 13.80 रुपयांवर बंद झाला.

मार्च तिमाहीत इतका नफा

मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत येस बँकेने ३६७ कोटी रुपयांचा बंपर नफा (Bumper Profit) कमावला. वर्षभरापूर्वीच मार्च 2021 च्या तिमाहीत येस बँकेला 3,788 कोटी रुपयांचा मोठा तोटा झाला होता. डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेला 266 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यामुळे डिसेंबरच्या तुलनेत मागील तिमाहीत बँकेच्या नफ्यात 37.9 टक्के वाढ झाली.

बुडीत कर्जाची तरतूदही घटली

इतकेच नव्हे तर संपूर्ण आर्थिक वर्ष (fiscal year 22) येस बँकेसाठी लाभदायक ठरले आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 नंतर प्रथमच पूर्ण वर्षात नफा कमावला आहे. त्याचबरोबर अडकलेल्या कर्जाच्या तरतुदींमध्येही लक्षणीय घट झाली आहे. बँकेने मार्च 2022 च्या तिमाहीत 271 कोटी रुपयांची तरतूद केली. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत हा आकडा 375 कोटी रुपये आणि मार्च 2021 च्या तिमाहीत 5,113 कोटी रुपये होता. येस बँकेची ही दमदार कामगिरी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.