काय सांगता! तुमच्याकडेही 500 रुपयांची जुनी नोट आहे, मग तुम्हाला 10 हजार मिळणार, पण कसे?
भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे नोटा छापण्याचे काम सोपवण्यात आलेय आणि RBI चलनी नोटा अतिशय काळजीपूर्वक छापते. तसेच त्या नोटांचा नमुना निश्चित करते आणि त्यानुसार नोटा छापल्या जातात. त्यामुळे सर्व नोटा दिसायला सारख्याच असतात. पण छपाईच्या वेळी नोटेमध्ये काही चूक झाली आणि ती बाजारात आली तर ती नोट खास बनते.
नवी दिल्ली : जर तुम्हीही जुनी 500 रुपयांची नोट (500 rs old note) स्वतःकडे ठेवली असेल, तर तुम्ही घर बसल्या श्रीमंत होऊ शकता. पाचशे रुपयांची ही नोट भारत सरकारने चार वर्षांपूर्वी बंद केली असली तरी आजही बाजारात त्याची किंमत हजारो रुपये आहे. या नोटेचा ऑनलाईन लिलाव करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.
जाणून घ्या नोटेची खासियत?
भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे नोटा छापण्याचे काम सोपवण्यात आलेय आणि RBI चलनी नोटा अतिशय काळजीपूर्वक छापते. तसेच त्या नोटांचा नमुना निश्चित करते आणि त्यानुसार नोटा छापल्या जातात. त्यामुळे सर्व नोटा दिसायला सारख्याच असतात. पण छपाईच्या वेळी नोटेमध्ये काही चूक झाली आणि ती बाजारात आली तर ती नोट खास बनते. या नोटा कितीतरी पट किमतीनं विकत घेण्यासाठी लोक तयार होतात.
ही नोंद असावी
तुमच्याकडे 500 रुपयांची जुनी नोट असेल, तर तिचा अनुक्रमांक दोनदा छापला आहे का ते लगेच तपासा. तसे असल्यास तुम्हाला या नोटेच्या बदल्यात 5,000 रुपये मिळू शकतात. याशिवाय 500 रुपयांच्या नोटेची एक धार मोठी असेल, म्हणजेच त्यावर अतिरिक्त कागद ठेवला असेल, तर त्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपये मिळू शकतात.
ऑनलाईन लिलाव कसा करायचा?
oldindiancoins.com या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करा. तुमची नोंदणी केल्यानंतर तुमच्या 500 रुपयांच्या नोटेचा फोटो वेबसाईटवर अपलोड करा. इच्छुक खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता.
संबंधित बातम्या
त्वरा करा! स्वस्त सोने खरेदीची आज शेवटची संधी, थेट RBI पोर्टलवरून जाणून घ्या किंमत
पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा