LIC IPO: एलआयसी आयपीओ वर सवलतींचा वर्षाव, बंपर डिस्काउंटची हॅट्रिक; जाणून घ्या-

तुम्ही एलआयसी पॉलिसीधारक, कर्मचारी किंवा रिटेल गुंतवणुकदार असल्यास तुम्हाला 60 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एलआयसीने पॉलिसी धारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, रिटेल गुंतवणुकदार (retail investor) तसेच कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये शेअर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.

LIC IPO: एलआयसी आयपीओ वर सवलतींचा वर्षाव, बंपर डिस्काउंटची हॅट्रिक; जाणून घ्या-
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 4:16 PM

नवी दिल्ली- बहुप्रतीक्षित एलआयसी आयपीओच्या (LIC IPO) लाँचिंगच्या घटिका समीप आल्या आहेत. येत्या 4 मे रोजी सार्वजनिक होणारा आयपीओ 9 मे पर्यंत खुला असणार आहे. शेअर बाजारात 17 मेला स्टॉक सूचीबद्ध होईल. तुम्ही एलआयसी आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याच्या विचारात असल्यास तुम्हाला बंपर डिस्काउंटची संधी आहे. एलआयसी आयपीओसाठी प्रति शेअर 902-949 रुपयांचा प्राईस बँड (price band) निश्चित करण्यात आला आहे. मात्र, तुम्ही एलआयसी पॉलिसीधारक, कर्मचारी किंवा रिटेल गुंतवणुकदार असल्यास तुम्हाला 60 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एलआयसीने पॉलिसी धारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, रिटेल गुंतवणुकदार (retail investor) तसेच कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये शेअर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.

डिस्काउंट हॅट्रिक

तुम्ही एलआयसीचे कर्मचारी असाल आणि तुमच्याकडे पॉलिसी असेल आणि रिटेल गुंतवणुकदारही असल्यास तुम्ही तिन्ही प्रकारच्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. एलआयसीचे चेअरमन एम.आर. कुमार यांनी एलआयसी आयपीओच्या माध्यमातून डिस्काउंट प्राप्त करु इच्छिणाऱ्या अर्जदाराला तीन स्वतंत्र श्रेणीत अर्ज करावे लागतील

अँकर इन्व्हेस्टर सज्ज

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार 21 हजार कोटी रुपयांच्या आयपीओच्या पूर्वीच एलआयसी शेअर्सच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये उभारू शकते. दरम्यान, अँकर इन्व्हेस्टरने 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. अँकर गुंतवणुकदारांना (ANCHOR INVESTOR) केंद्रानं निमंत्रण धाडली आहेत. सरकारने अबूधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी, जीआयसी, कॅनडाचे तीन पेन्शन फंड आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी आदींचा यादीत समावेश आहे त्यामुळे एलआयसीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यतेला बळकटी मिळाली आहे. एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 22 कोटींहून अधिक शेअर्सची विक्री केली जाईल. अँकर गुंतवणुकदारांसाठी 5.9 कोटी, कर्मचाऱ्यांसाठी 15.8 लाख, पॉलिसीधारकांसाठी 2.2 कोटी शेअर असणार आहेत.

निर्गुंतवणुकीचं मेगा बजेट

गेल्या आर्थिक वर्षात 78 हजार कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले होते. त्यासाठी आयुर्विमा कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकून 63 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची तयारी होती. डीआरएचपी अर्थात आयपीओचा प्रस्ताव एलआयसीने सेबीकडे 13 फेब्रुवारी रोजी सादर केला होता. एलआयसीकडे सध्याच्य स्थितीत 28.3 कोटी विमा पॉलिसी आहेत आणि 13.5 लाख प्रतिनिधी अर्थात एजंटचे जाळे आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.