क्रिप्टोकरन्सीद्वारे FD आणि RD मध्ये करू शकता गुंतवणूक, ही बँक देतेय मोठी सुविधा
15 ऑगस्टच्या आसपास बँकेचे कामकाज सुरू होताच ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट एफडी आणि रिकरिंग डिपॉझिट आरडीमध्ये बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली जाऊ शकते.
नवी दिल्ली : यूके स्थित क्रिप्टोकरन्सी बँक कॅशा (cashaa) लवकरच भारतात आपले काम सुरू करणार आहे. असे म्हटले जातेय की 15 ऑगस्टपर्यंत (ऑगस्टच्या मध्यात) ही बँक भारतात आपले कामकाज सुरू करेल. भारतात, ही बँकिंग सेवा युनिकास(unicas)च्या नावाने सुरू केली जाऊ शकते, ज्यामध्ये युनायटेड आणि काशाची भागीदारी असेल. ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी वित्तीय संस्था असेल ज्यांची शाखा सुरू होणार आहे. येथे शाखा म्हणजे फिजिकल शाखा, जसे आपण बँकांच्या शाखा पाहतो जेथे व्यवहारांपासून गुंतवणुकीपर्यंत काम होते. (You can invest in FD and RD through cryptocurrency, this is a great facility offered by the bank)
BusinessToday.in च्या अहवालानुसार, क्रिप्टोकरन्सी बँक कॅशा (युनिकास) भारतात बचत, कर्ज आणि व्यापार संबंधित सेवा सुरू करू शकते. 15 ऑगस्टच्या आसपास बँकेचे कामकाज सुरू होताच ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट एफडी आणि रिकरिंग डिपॉझिट आरडीमध्ये बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली जाऊ शकते. बँक ग्राहकांसाठी अशी योजना बनवत आहे. क्रिप्टोमध्ये उघडण्यात येणारी एफडी सुरु केली जाईल, तिचा काही मॅच्युरिटी कालावधी असेल. जसे बँका छोट्या ठेवी असलेल्या लोकांनाही गुंतवणूक करण्याची परवानगी देतात, कॅशा क्रिप्टोच्या ग्राहकांसाठीही अशीच योजना बनवत आहे. लोकांना हवे असल्यास, ते छोट्यापासून दररोज क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.
काय आहे बँकेची तयारी?
युनिकासचे व्यवस्थापकीय भागीदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कुकरेजा या योजनेबद्दल सांगितले की, किरकोळ ठेवीदार किंवा व्यापाऱ्यांना सेवा देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्याप्रकारे आपले भविष्य सुनिश्चित करण्याशाठी एफडी आणि आरडी सेवा घेतल्या जातात, त्याच सेवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून एफडी आणि आरडीमध्ये देण्याची योजना आहे. ग्राहकांसाठी एक सुविधा निर्माण करावी लागेल ज्यात ते जेव्हा हव्या असतील तेव्हा गुंतवणूक सुरू करू शकतात.
हे एक्सचेंज प्रदान करते सुविधा
दुसरीकडे, देशातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज जेबपे फिक्स्ड क्रिप्टो डिपॉझिटची सेवा सुरू केली आहे. यामध्ये, ग्राहक 90 दिवसांच्या कालावधीसाठी आपली क्रिप्टोकरन्सी जमा करू शकतो आणि त्याला त्या ठेवीवर निर्धारीत किंवा निश्चित व्याज मिळू शकते. कुकरेजा यांनी बिझनेस टुडेला सांगितले की, सध्या युनिकासच्या दिल्ली, जयपूर आणि गुजरातमध्ये तीन शाखा आहेत. याचे मुख्यालय जयपूर, राजस्थान येथे आहे. लवकरच देशाच्या इतर भागातही युनिकास शाखा सुरू होतील, अशी आशआ कुकरेजा यांनी व्यक्त केली आहे.
किती व्याज मिळेल
भारतीय रुपया आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये बचत खात्याअंतर्गत अनेक उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. क्रिप्टो एफडी किंवा आरडी अंतर्गत दरवर्षी 4 टक्के ते 9.67 टक्के व्याज दिले जाईल. बँकेची योजना अशी आहे की जिथे त्यांची फिजिकल शाखा उघडली जाईल, तिथे ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा प्रदान करेल. ग्राहकाला हवे असल्यास, शुल्क भरून, तो घरीच बँकिंगशी संबंधित सेवा घेऊ शकतो. क्रिप्टोकरन्सी तारण ठेवून, ग्राहक इच्छित असल्यास कर्ज देखील घेऊ शकतो. युनिकास प्रतिदिन 0.04 टक्के व्याज आकारेल. ग्राहकांना हवे असल्यास, ते एका दिवसासाठी युनिकासकडून कर्ज घेऊ शकतात. (You can invest in FD and RD through cryptocurrency, this is a great facility offered by the bank)
कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोपhttps://t.co/BJBQqteePH#kalanemining | #Maharashtra | #Kokan | #VaibhavNaik | #NarayanRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 31, 2021
इतर बातम्या
सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?
घरगुती सिलिंडरमधून अडीच किलो गॅसची चोरी, 43 गॅसच्या टाक्या जप्त, 3 आरोपींना अटक