Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही NPS वर 3 प्रकारे कर वाचवू शकता, तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार, पगारावर स्वतंत्रपणे लाभ

या अंतर्गत अशा लोकांना त्यांच्या 50 टक्के निधी इक्विटी किंवा शेअर्समध्ये जमा करण्याची परवानगी देण्यात आलीय. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बाहेर पडण्याचे नियम शिथिल करण्यात आलेत. NPS मध्ये प्रवेशाचे वय 18-65 वरून 18-70 करण्यात आलेय.

तुम्ही NPS वर 3 प्रकारे कर वाचवू शकता, तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार, पगारावर स्वतंत्रपणे लाभ
money business idea
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 8:10 AM

नवी दिल्लीः नॅशनल पेन्शन सिस्टीम किंवा NPS वर एकाच वेळी तीन प्रकारचे कर लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80CCD (1), 80CCD (2) आणि कलम 80CCD (1b) अंतर्गत कर वाचवता येतो. निवृत्ती निधीसाठी एनपीएस ही सर्वोत्तम गुंतवणूक मानली जाते. या योजनेला सरकारचा पाठिंबा आहे, त्यामुळे परताव्याचीही हमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे चालवली जाणारी ही योजना खातेदारांना कर वाचवण्याची संधी देखील देते. पीएफआरडीएने 65 वर्षांनंतर एनपीएसमध्ये सामील होणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनवलेय.

शेअर्समध्ये जमा करण्याची परवानगी देण्यात आलीय

या अंतर्गत अशा लोकांना त्यांच्या 50 टक्के निधी इक्विटी किंवा शेअर्समध्ये जमा करण्याची परवानगी देण्यात आलीय. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बाहेर पडण्याचे नियम शिथिल करण्यात आलेत. NPS मध्ये प्रवेशाचे वय 18-65 वरून 18-70 करण्यात आलेय. पीएफआरडीएनुसार, 65-70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक किंवा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) NPS मध्ये सामील होऊ शकतो. तो वयाच्या 75 व्या वर्षांपर्यंत या योजनेशी संबंधित राहू शकतो.

तो पेन्शनचे उर्वरित पैसे एकरकमी स्वरूपात घेऊ शकतो

एनपीएसमधून पैसे काढताना खातेदाराला निधीचा काही भाग वार्षिकीमध्ये जमा करावा लागतो. तो पेन्शनचे उर्वरित पैसे एकरकमी स्वरूपात घेऊ शकतो. वार्षिकी अंतर्गत फंड PFRDA शी जोडलेल्या जीवन विमा कंपनीमध्ये गुंतवला जातो. एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती उघडली जातात – टियर 1 आणि टियर 2. जेव्हा एखादी व्यक्ती एनपीएस खाते उघडते, तेव्हा टियर 1 खाते निश्चितपणे उघडले जाते, तर टियर 2 खाते पर्यायी असते. खातेदार स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार टियर 2 खाते उघडू शकतो.

NPS चे कर लाभ

कलम 80 सीसीडी (1) – कलम 80 सीसीडी (1) अंतर्गत खातेधारकाला टियर 1 खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर सूटचा लाभ मिळतो. टियर 1 एनपीएस खात्यात जमा केलेल्या रकमेवर एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळू शकतो. टियर 1 खात्यात जमा केलेल्या 1.5 लाख रुपयांवर तुम्ही कपातीचा दावा करू शकता.

कलम 80 सीसीडी (2)- कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यासाठी एनपीएस टियर 1 खात्यात जमा केलेल्या रकमेला कलम 80 सीसीडी (2) अंतर्गत कर सूटचा लाभ दिला जातो. विद्यमान नियमांनुसार, कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 10% रक्कम एनपीएस टियर 1 खात्यात जमा करू शकते. येथे पगार म्हणजे मूळ वेतन आणि डीए असतो. कंपनी एनपीएस टियर 1 खात्यात कर्मचाऱ्याच्या नावावर 10 टक्के रेंजमध्ये जास्तीत जास्त पैसे जमा करू शकते. जमा केलेली रक्कम पगाराच्या 10% पेक्षा जास्त असू शकत नाही. कर सवलतीचा हा लाभ कलम 80CCD (1) पेक्षा वेगळा आहे.

कलम 80 सीसीडी (1 बी)- या कलमांतर्गत एनपीएस खातेदार एका वर्षात जास्तीत जास्त 50,000 रुपयांचा कर लाभ घेऊ शकतो. कर कपातीचा हा नियम 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. 50,000 रुपयांचा कर लाभ कलम 80CCD (1) आणि कलम 80CCD (2) पेक्षा वेगळा आहे.

NPS खातेधारकांना तीन प्रकारचे कर लाभ मिळतात

NPS खातेधारकांना तीन प्रकारचे कर लाभ मिळतात, परंतु NPS ची संपूर्ण रक्कम करमुक्त नाही. एनपीएस खातेधारक स्वतःच्या स्तरावर कलम 80 सीसीडी (1) आणि कलम 80 सीसीडी (1 बी) अंतर्गत कर सूट घेऊ शकतो. जर खातेदार कोणत्याही नोकरीत असेल तर कंपनीला मूळ पगारावर 10% चा वेगळा लाभ मिळेल. एनपीएस खात्यावर त्याच्या ऑपरेशनदरम्यान मिळणारे उत्पन्न करमुक्त असते, तर एका वर्षात एन्युइटीमधून मिळणारे उत्पन्न करपात्र असते.

संबंधित बातम्या

अवघ्या 1 लाखात घरी न्या Maruti ची 32 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

फाटलेल्या नोटांबाबत मोठी बातमी, RBI ने सर्व बँकांच्या ग्राहकांना दिल्या ‘या’ सूचना

You can save tax on NPS in 3 ways, you will get a rebate of up to Rs 2 lakh, independent benefit on salary

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.