तुम्हाला 10 लाख जिंकता येणार, RBI असा देणार मौका, मग या प्रश्नांची उत्तरं ठेवा

RBI90Quiz : RBI 90 क्विझ मधून 10 लाख जिंकण्याची मोठी संधी मिळत आहे. इतर ही अनेक आकर्षक बक्षीसं आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही स्पर्धा आयोजी केली आहे. त्यासाठीची नोंदणी दोन दिवसांपूर्वी सुरु झाली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत नोंदणी कार्यक्रम सुरु असेल, काय आहे हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम?

तुम्हाला 10 लाख जिंकता येणार, RBI असा देणार मौका, मग या प्रश्नांची उत्तरं ठेवा
प्रश्नाची उत्तरे द्या, 10 लाख जिंका
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 5:11 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पदवीपूर्वी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरु केली आहे. ही एक राष्ट्रीय स्पर्धा आहे. केंद्रीय बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्याने ती आयोजीत करण्यात आली आहे. क्विझमध्ये सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. ही परीक्षा ऑनलाईन असेल. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. तर अंतिम फेरीत सर्व राज्यातील विजेते असतील.

आरबीआय गव्हर्नरने आयोजीत केली स्पर्धा

20 ऑगस्ट 2024 रोजी RBI90Quiz ऑनलाइन प्लॅटफ़ॉर्म लाँच करण्यात आला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि भारतीय रिझर्व्ह बँकेविषयी जागरुकता आणण्यासाठी मदत करणार आहे. भारतीय तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेसह डिजिटल उत्पादन आणि डिजिटल आर्थिक व्यवहाराविषयीची जागरुकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. RBI 90 क्विझ कार्यक्रमात भाग घेणाऱ्या संघाना विविध स्तरावर आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

10 लाखांपर्यंत रक्कम जिंकण्याची संधी

पहिला पुरस्कार 10 लाख रुपयांचा आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार 8 लाख तर तिसरा पुरस्कार 6 लाख रुपयांचा आहे. विभागीय स्तरावर पहिले बक्षिस 5 लाख, त्यानतंर दुसरे बक्षीस 4 लाख तर तिसरे बक्षीस 3 लाख रुपयांचे आहे. तर राज्यस्तरावर पहिले बक्षिस 2 लाख दुसरे बक्षीस 1.5 लाख आणि तिसरे बक्षीस 1 लाख रुपये आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. तर अंतिम फेरीत सर्व राज्यातील विजेते असतील. त्यातून पहिला, दुसरा आणि तिसऱ्या पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय स्तरावर ठरवले जातील.

स्पर्धेत कोणाला घेता येईल भाग?

RBI90Quiz मध्ये पदवीपूर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. ज्याचे वय 1 सप्टेंबर, 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी असेल म्हणजे ज्यांचा जन्म 01 सप्टेंबर 1999 रोजी अथवा त्यानंतर झाला असेल ते या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. भारतीय महाविद्यालयात कोणत्याही शाखेत शिकणारे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?
खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.