PF Alert: सावध व्हा, अन्यथा पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत

PF Account | भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास तुमचे पीएफचे पैसे मिळवण्यात बऱ्याच अडचणीही येऊ शकतात.

PF Alert: सावध व्हा, अन्यथा पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत
पीएफ खात्यात व्याज जमा
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:21 AM

मुंबई: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर महिन्याला नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास तुमचे पीएफचे पैसे मिळवण्यात बऱ्याच अडचणीही येऊ शकतात.

तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही पीएफचे पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन क्लेम करु शकत नाही. क्लेम सबमिशनसाठी आधारशी लिंक असलेल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला पीएफचे पैसे मिळवण्यासाठी वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक

केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत की, सर्व राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक केले पाहिजेत, जेणेकरुन लसीकरणासाठीचे संदेश पाठवणे सोपे होईल. जर, आपण आधीच आधार कार्ड मोबाईल फोन नंबरशी लिंक केले असेल, तर आपल्याला हे काम पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. परंतु, ज्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेला नाही, ते लोक हे काम करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊ शकता.

पीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ई नॉमिनेशन. त्यामुळे पीएफ खातेधारक घरबसल्याही ई-नॉमिनेशन फाईल करु शकतात. ईपीएफओ सदस्य https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या पोर्टलवर जाऊन हा फॉर्म भरू शकतात. भविष्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात.

ऑनलाईन ई-नॉमिनेशची प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

* सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचे अकाऊंट लॉगिन करावे. * तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर अकाऊंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अलर्ट येईल. * त्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करावे. नंतर स्क्रॉलडाऊनमधील e-nomination हा पर्याय निवडावा. * नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाविषयीची माहिती विचारली जाईल. * त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचा आधार, नाव, जन्मतारीख, बँक अकाऊंट असा तपशील भरावा लागेल. * त्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Save EPF Nomination या पर्यायावर क्लिक करावे.

संबंधित बातम्या:

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.