तुमच्या आवडती मारुती कार महागणार; किंमत का आणि किती वाढणार?
मारुतीने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या निवेदनात वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे कंपनी दरात वाढ करत असल्याचे म्हटले होते. कारण खर्च कमी करण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा स्टीलच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उत्सर्जनाच्या कठोर नियमांमुळे भारतात आणि जागतिक बाजारपेठेत त्यांच्या किमती वाढल्यात.
नवी दिल्लीः Maruti Suzuki Car price : मारुती सुझुकी पुन्हा एकदा आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे, अशी कंपनीने गुरुवारी घोषणा केली. मारुतीच्या वेगवेगळ्या व्हेरियंटच्या किमती वाढवल्या जातील. किमतीत वाढ झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय. मारुती सुझुकीने 2021 मध्ये तीन वेळा कारच्या किमती वाढवल्यात. सप्टेंबरमध्ये 1.9 टक्के, यापूर्वी जानेवारी आणि एप्रिलमध्ये किमती एकूण 3.5 टक्क्यांनी वाढल्या होत्या.
Eeco च्या सर्व नॉन-कार्गो प्रकारांच्या किमती वाढवल्यात
मारुती सुझुकीने 30 नोव्हेंबरला आपल्या व्हॅन Eeco च्या सर्व नॉन-कार्गो प्रकारांच्या किमती वाढवल्यात. मारुती Eeco मध्ये पॅसेंजर एअरबॅग जोडण्यात आलीय. त्यामुळेच त्याच्या किमतीत आठ हजार रुपयांनी वाढ करण्यात आलीय. Eeco च्या किमतीतील ही वाढ 30 नोव्हेंबर 2021 पासून लागू झालीय.
आता पुढे काय होणार?
ऑटो क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मारुती ही बाजारात आघाडीवर आहे. त्याच्या एका निर्णयाचा संपूर्ण कार मार्केटवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत इतर कंपन्याही किंमत वाढवण्याची घोषणा करू शकतात.
कारच्या किमती का वाढतायत?
मारुतीने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या निवेदनात वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे कंपनी दरात वाढ करत असल्याचे म्हटले होते. कारण खर्च कमी करण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा स्टीलच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उत्सर्जनाच्या कठोर नियमांमुळे भारतात आणि जागतिक बाजारपेठेत त्यांच्या किमती वाढल्यात.
किंमत वाढल्यानंतर विक्रीवर काय परिणाम?
नोव्हेंबरमधील विक्रीचे आकडे बघितले तर या कालावधीत मारुती सुझुकीची एकूण विक्री 9 टक्क्यांनी घसरून 1,39,184 युनिट्सवर आली. त्याच वेळी अगदी एक वर्षापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये मारुतीने एकूण 1,53,223 कार विकल्या होत्या. एकूण निर्यात 9,004 युनिट्सवरून 21,393 युनिट्सपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील विक्रीचे आकडे पाहिल्यास विक्रीत काही सुधारणा झालीय. विक्रीचे आकडे जाहीर करताना कंपनीने म्हटले होते की, नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे कारच्या उत्पादनावर परिणाम झाला. हा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी वेगाने पावले उचलत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही समस्या सुटण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या
आनंदाची बातमी! सोने स्वस्त, चांदीही घसरली, पटापट तपासा ताजे दर
20000 रुपयांत ‘या’ वनस्पतीची करा लागवड, 3.5 लाख सहज कमवा, कसे ते जाणून घ्या?