Zomato Share Price : झोमॅटो गुंतवणूकदारांचे झूम झूम झूम बाबा! कंपनीला असा झाला फायदा

Zomato Share Price : दुख भरे दिन बीते रे भैया, असं काहीसा चमत्कार झोमॅटोसोबत घडला आहे. गेल्या काही दिवसांपासूनचे मळभ दूर झाले आहे. लंडनमधील या बँकेने घेतलेल्या निर्णयाचा मोठा फायदा या कंपनीला झाला आहे. त्यामुळे शेअरने एकदम उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे.

Zomato Share Price : झोमॅटो गुंतवणूकदारांचे झूम झूम झूम बाबा! कंपनीला असा झाला फायदा
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 5:18 PM

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोवरील मळभ कमी होत आहे. झोमॅटोच्या शेअरला एकदम तरतरी आली आहे. एक मोठा चमत्कार या झोमॅटोसोबत घडला आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर अचानक वधारला. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने (SoftBank Vision Fund-SVF) या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता हे शेअर या फायनेन्शिअल फर्मने विक्री केले आहे. त्याचा फायदा झोमॅटोला होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे शेअर बाजारात, फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा शेअर (Zomato Share Price) वधारला. गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढले.

SVF ग्लोबलने विकले शेअर

SVF ग्लोबलने बुधवारी झोमॅटोचे 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. या शेअरची विक्री 94.7 रुपयांच्या ब्लॉक डीलच्या रुपाने करण्यात आली. त्यामुळे बाजारात 947 कोटी रुपयांचे शेअर आले. त्याचा फायदा झोमॅटोला झाला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली.

हे सुद्धा वाचा

झोमॅटोचा शेअर वाढला 5 टक्क्यांनी

मोठ्या प्रमाणात कंपनीचे शेअर बाजारात दाखल झाले. त्यामुळे कंपनीच्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग वाढले. बाजाराच्या पहिल्या सत्रातच झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. हा शेअर चढून 99 रुपयांवर पोहचला. आता गुरुवार आणि शुक्रवारी या शेअरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

दुसऱ्या फर्मने पण विकले शेअर

डनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. त्यापाठोपाठ गुंतवणूक फर्म टायगर ग्लोबल मॅनेजमेंटने त्यांची पूर्ण 1.44 टक्के हिस्सेदारी विकली. हा वाटा बल्क डीलमध्ये विक्री करण्यात आली. हा सौदा जवळपास 1123 कोटी रुपयांचा झाला. त्यामुळे झोमॅटोचा शेअर झपाट्याने वधारला.

या करारामुळे मिळाले होते शेअर्स

झोमॅटोने गेल्या वर्षी ग्रोसरी डिलिव्हरी फर्म ब्लिंकईटचे अधिग्रहण केले होते. या करारामुळे स्फॉटबँक व्हिजन फंडला झोमॅटोमध्ये एकूण 3.35 टक्क्यांची हिस्सेदारी मिळाली होती. या डीलनुसार, 25 ऑगस्टपर्यंत ही गुंतवणूक फर्म झोमॅटोच्या शेअर्सची विक्री करु शकत नव्हती. त्यामुळे ही डेडलाईन संपताच झोमॅटोने त्यांचा वाटा विकला. सॉफ्टबँकेने झोमॅटोतील 1.17 टक्के हिस्सेदारी विकली.

स्विगीकडे लक्ष

झोमॅटोच्या शेअरमध्ये आतापर्यंत 54.8% वाढ झाली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने झोमॅटोला (Zomato) टक्कर देण्यासाठी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी केली आहे. स्विगीमध्ये जपानमधील दिग्गज गुंतवणूक संस्था, सॉफ्टबँकने यापूर्वीच गुंतवणूक केली आहे. स्विगीतील घडामोडींकडे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.