झोमॅटोने एक पैसाही खर्च न करता ग्राहकांच्या खिशातून काढले 83 कोटी ? या म्हणतात बिझनेस आयडिया

झोमॅटो फूड डिलिव्हरी एपचे उत्पन्न 2023-24 मध्ये 27 टक्क्यांनी वाढून 7,792 कोटी रुपये झाले आहे. ही कंपनी 2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी गुडगाव हरियाना येथून सुरु केली होती.

झोमॅटोने एक पैसाही खर्च न करता ग्राहकांच्या खिशातून काढले 83 कोटी ? या म्हणतात बिझनेस आयडिया
FOOD DELIVERY GIANT ZOMATOImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 8:38 PM

कोणताही पैसा न खर्च करता बिझनेस करुन ग्राहकांच्या खिशातून पैसा कसा काढावा याचा उत्तम उदाहरण म्हणून झोमॅटोकडे पाहीले जाते. गेल्या ऑगस्टपासून ते मार्चपर्यंत ग्राहकांना एक पैशांचे सामान न देता त्यांच्याकडून 83 कोटी रुपये वसुल केले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल परंतू हे खरे आहे. झोमॅटो ही भारतातील ऑनलाईन फूड डिलीव्हरी देणारी जाएंट कंपनी आहे. कंपनीने संपलेल्या आर्थिक वर्षात प्लॅटफॉर्म फिच्या रुपाने 83 कोटी रुपये कमावले आहेत. झोमॅटोने गेल्यावर्षीपासून प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म म्हणून सेवा फि वसुल करण्यास सुरुवात केली होती. स्विगी किंवा झोमॅटो एपवरुन तुम्ही अन्नपदार्थ मागविताना फूडची किंमत अधिक अतिरिक्त शुल्क तुम्हाला भरावे लागत आहे. यालाच प्लॅटफॉर्म फि म्हणतात.

प्लॅटफॉर्म फिही झोमॅटोचा महसूल वाढविणाऱ्या तीन प्रमुख घटकांपैकी एक आहे. झोमॅटो कंपनीचे उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये 27 टक्क्यांनी वाढून 7,792 कोटी रुपयांची झाली आहे. जीओव्ही ( सकल ऑर्डर मूल्य ) च्या टक्क्यात वाढ जारी आहे. कारण रेस्टॉरंटच्या कमिशन दरात वाढ झालेली वाढ, जाहीरात दराच्या सुधारणा आदीमुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.

बंगलोरमधून नाश्ता तर दिल्ली-एनसीआर मधून डिनर ऑर्डर

या सर्व कारणांनी गोल्ड ऑर्डरवर उपलब्ध मोफत डिलीव्हरीच्या लाभामुळे प्रति ऑर्डर ग्राहक डिलीव्हरी शुल्कच्या कमीची भरपाई केली गेली. गेल्या आर्थिक वर्षात रात्री उशीरा ऑर्डर करण्याचे प्रमाण दिल्ली – एनसीआरमध्ये सर्वाधिक होते. तर नाश्त्यासाठी सर्वाधिक ऑर्डर बंगळुरु येथून आले होते. झोमॅटोने गेल्या ऑगस्टपासून प्रत्येक ऑर्डर मागे 2 रुपये अतिरिक्त स्वीकारण्यास सुरुवात केली होती. ही फी हळूहळू वाढवित प्रमुख शहरात आता सहा रुपये केली आहे. झोमॅटोची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी कंपनी देखील प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फि आकारत आहे.

प्लॅटफॉर्म फी का घेतली जाते –

प्लॅटफॉर्मची देखभाल – स्विगी आणि झोमॅटो आपल्या मोबाईल एप आणि वेबसाईटला सुरक्षित, अपडेट करण्यासाठी सातत्याने पैसे खर्च करीत आहेत

डिलिव्हरी पार्टनर्स – तुमच्या ऑर्डर वेळेवर पोहचविणाऱ्या रायडर म्हणजे डिलीव्हरी पार्टनर्सना मोबदला देण्यासाठी या फिचा वापर

अन्य खर्च – मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि अन्य संचालन खर्च कव्हर करण्यासाठी देखील या फिचा वापर केला जातोय

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.