Zomato चे Business Model: 1-2 नव्हे 10 माध्यमातून करोडो रुपये कमवते कंपनी

Zomato Business Model : झोमॅटोला आता कोणतीही वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. सर्वांच्या मोबाईलमध्ये हे अॅप असणं आता सामान्य झालं आहे. पण ही कंपनी सुरु केली तेव्हा पासून त्याला किती संघर्ष करावा लागला हे कोणालाच माहित नाही. आज कंपनी वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवते आहे. पैसे कमवण्याचे स्त्रोत किती असू शकतात यावरुन तुम्हाला याची कल्पना येईल.

Zomato चे Business Model: 1-2 नव्हे 10 माध्यमातून करोडो रुपये कमवते कंपनी
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 5:30 PM

ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी सर्वात मोठी कंपनी 2012 मध्ये आली. तीन मित्रांनी मिळून फूडपांडा ही कंपनी सुरू केली होती. हळूहळू कंपनीचा व्यवसाय 45 देशांमध्ये विस्तारत गेला. दररोज 2 लाखाहून अधिक ऑर्डर येऊ लागल्या. काही वेळातच ही कंपनी 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. पण त्यानंतर कंपनीची स्थिती बिघडली. त्यामुळे ओलाने 2017 मध्ये ही कंपनी केवळ 250 कोटी रुपयांना विकत घेतली. त्यानंतर ओलाने यात सुमारे 500 कोटींची गुंतवणूक केली, पण नंतर 2019 मध्ये ही कंपनी बंद करावी लागली. आता बाजारात झोमॅटो आणि स्विगी या सर्वात मोठ्या फूड डिलिव्हरी कंपन्या आहेत. आजपर्यंत या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपलं नशीब आजमावलं. पण त्यांना फारसा नफा मिळवता आला नाही. पण दीपंदर गोयल यांच्या झोमॅटोने मात्र यातून चांगला नफा कमवला. त्यांची कंपनी कशी करते कमाई जाणून घेऊयात.

Zomato चे बिझनेस मॉडेल काय आहे?

अनेक कंपन्या कदाचित एकाच माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात असतील म्हणून जास्त नफा कमवू शकल्या नसतील. पंरतू झोमॅटोने एक-दोन नव्हे तर अनेक प्रकारे पैसे कमवले. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीला नफा मिळत नव्हता, मात्र आता कंपनी नफ्यात आली आहे.

1- रेस्टॉरंट सूचीबद्ध करणे

झोमॅटोच्या कमाईचा सर्वात मोठा भाग हा कंपनीच्या ॲपवर रेस्टॉरंट सूचीबद्ध करण्यापासून येतो. एका रेस्टॉरंटला लिस्टमध्ये आणण्यासाठी  कंपनी मालकाकडून सुमारे 1000 रुपये आकारते. हे फक्त एका वेळचे शुल्क आहे. जे रेस्टॉरंटला द्यावे लागते, मग त्याला ऑर्डर मिळो किंवा न मिळो.

2- जाहिरातीतून प्रचंड उत्पन्न

कंपनी ॲपवरच तुम्हाला अनेक रेस्टॉरंटच्या जाहिराती दिसत असतील. पण कंपनी त्यासाठी त्यांच्याकडून पैसे वसूल करते. Zomato रेस्टॉरंटला जितकी अधिक दाखवेल तितके जास्त शुल्क आकारते. Zomato चे जाहिरातीसाठी वेगवेगळे पॅकेज आहेत.

3- डिलिव्हरी फी

Zomato वरून जेव्हा तुम्ही काही ऑर्डर करता तेव्हा तुम्ही त्यावर तीन प्रकारचे शुल्क भरता. पहिले म्हणजे उत्पादन म्हणजे अन्नाची किंमत. दुसरे रेस्टॉरंट हाताळणी शुल्क. तिसऱ्या क्रमांकावर डिलिव्हरी चार्ज. जो झोमॅटो तुमच्याकडून कोणतेही उत्पादन डिलिव्हरी करण्यासाठी आकारते.

4- रेस्टॉरंटकडून कमिशन

झोमॅटोवरुन तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटचे जेवण मागवता. तेव्हा ते महाग असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. कारण रेस्टॉरंटना झोमॅटोचे ॲप वापरून त्यांची उत्पादने विकण्यासाठी कमिशन द्यावे लागते. त्यामुळे झोमॅटोवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी रेस्टॉरंटही ग्राहकांकडून हे शुल्क वसूल करतात. हे शुल्क 2-3 पॅकेजेसमध्ये देखील दिले जाते, जे तुमच्या ऑर्डर मूल्याच्या 23% ते 27% पर्यंत असते.

5- Zomato ला लॉयल्टी प्रोग्राम

झोमॅटोने आपल्या लॉयल्टी प्रोग्रामद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला. अनेक कंपन्यांप्रमाणे, Zomato देखील एक लॉयल्टी प्रोग्राम चालवते, ज्याद्वारे ते अधिकाधिक ग्राहकांना जोडते. यामध्ये कंपनी Zomato गोल्ड सबस्क्रिप्शन ऑफर करते, ज्याची किंमत वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळी आहे. हा देखील कंपनीच्या उत्पन्नाचा हा देखील एक मोठा स्रोत आहे. पण कंपन्या याकडे कमाईपेक्षा ग्राहकांची संख्या वाढवण्याचे साधन म्हणून पाहतात. यामुळे इतर पद्धतींमधून कमाई आपोआप वाढते.

6- इव्हेंट तिकीट विक्री

Zomatoवर आता तुम्हाला काही खास कार्यक्रमांची तिकिटे देखील विक्रीसाठी असल्याचं पाहिले असेल. यामध्ये ग्राहकांना विशिष्ट रेस्टॉरंटमध्ये नेले जाते. यामुळे रेस्टॉरंटला कमाई होते आणि Zomato ला त्याचा एक भाग मिळतो. हे फीचर Zomato Live या नावाने मिळू शकते.

7- प्लॅटफॉर्म फी

Zomato वरून जेव्हा तुम्ही काही ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला तेथे प्लॅटफॉर्म फी देखील दिसेल. सध्या ग्राहकांकडून त्यासाठी शुल्क म्हणून ५ रुपये घेण्यात येते. झोमॅटोने गेल्या वर्षी प्लॅटफॉर्म शुल्क 2 रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती वाढवून 3 रुपये करण्यात आली. नंतर ती हळूहळू वाढत गेली. कंपनीने दरवर्षी सुमारे 1 अब्ज म्हणजेच 100 कोटी वार्षिक ऑर्डरचा आकडा गाठला आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, कंपनी दरवर्षी 100 कोटी ऑर्डरमधून सुमारे 500 कोटी रुपये कमवते.

8- क्विक कॉमर्स- BlinkIt

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंक्ट देखील झोमॅटोचाच एक भाग आहे. यामध्ये तुम्ही डिलिव्हरी फी, प्लॅटफॉर्म फी किंवा वस्तू ऑर्डर करण्यासाठी तुम्ही भरलेले कोणतेही शुल्क देखील Zomato च्या खात्यात जोडले जाईल. BlinkIt वर सर्व विक्रेत्यांच्या सूचीसाठी घेतलेले शुल्क देखील Zomate ला प्राप्त झाले आहे. Goldman Sachs च्या मते, BlinkIt चे मूल्य दोन वर्षात Zomato च्या मुख्य व्यवसायाच्या म्हणजेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीपेक्षा जास्त झाले आहे. BlinkIt चे मूल्यांकन सुमारे $13 अब्ज पर्यंत पोहोचले आहे, जे मार्च 2023 मध्ये फक्त $2 अब्ज होते. Zomato चे एकूण मूल्यांकन सुमारे 20 अब्ज डॉलर्स आहे, त्यापैकी 13 अब्ज डॉलर्स फक्त BlinkIt चे मूल्यांकन आहे.

9- हायपरप्युअरमधून कमाई

Zomato कडे Hyperpure नावाचे आणखी एक बिझनेस मॉडेल आहे. हा व्यवसाय विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा करतो. याचा अर्थ, जर तुम्ही Zomato चे विक्रेते असाल आणि तुम्हाला मैदा, तांदूळ, डाळी, भाज्या, फळे किंवा कोणत्याही पॅकेजिंग आयटमची गरज असेल, तर तुम्ही ते सर्व Hyperpure कडून अतिशय चांगल्या किमतीत मिळवू शकता. अशाप्रकारे, हायपरप्युअरमधून कंपनीला जे काही उत्पन्न मिळते तेही झोमॅटोच्या खात्यात जमा केले जाते.

10- जोमलँड कार्यक्रमाचे आयोजन

Zomato तर्फे वेळोवेळी झोमॅटो इव्हेंट आयोजित केले जातात. हा कार्यक्रम ज्या शहरात होतो तेथे त्या शहरातील लोक जमतात. हा एक प्रकारचा फूड एंटरटेनमेंट कार्निव्हल असतो. ज्यातून कंपनी भरपूर कमाई करते.

अशा प्रकारे झोमॅटोने गेल्या काही वर्षात चांगली उंची गाठली आहे. झोमॅटो आता चांगला नफा कमवत आहे. झोमॅटोची सुरुवात दीपंदर गोयल आणि पंकज चढ्ढा या दोन मित्रांनी केली होती. Zomato ही 2008 मध्ये स्टार्टअप कंपनी होती. आधी त्याचे नाव foodiebay.com असे होते. तेव्हा दिल्लीत त्यांचं चांगलं नेटवर्क होतं. नंतर दोन वर्षे हा स्टार्टअप फूडबे या नावाने सुरू राहिला. त्यानंतर 2010-11 मध्ये त्याचे नाव झोमॅटो असे करण्यात आले. आज 13 देशांमध्ये झोमॅटो पसरला असून 106 शहरांमध्ये 2.55 लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स जोडले गेले आहेत. कंपनीची उलाढाल एक हजार कोटींहून अधिक झाली आहे.

कशी आली झोमॅटोची कल्पना

दीपिंदर आणि पंकज चड्ढा हे दोघेही आयआयटी दिल्लीतून शिकले आहेत. शिक्षण पूर्ण दीपंदर एका कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी करत असताना तो दररोज दुपारच्या जेवणाच्या वेळी कॅफेटेरियातील मेनू पाहण्यासाठी रांगेत उभा असायचा. यासाठी त्याला खूप वेळ वाया जात असल्याचं कळालं. मग दीपंदरला कल्पना सुचली की, आपण मेनू कार्ड स्कॅन करून कुठल्यातरी साइटवर का अपलोड करू नये. जिथे वेळ पण लागणार नाही. हा ट्रेंड पाहून दीपंदरला ऑनलाइन फूड डिलिव्हरीची कल्पना सुचली.

सुरुवातीला कंपनी सुरु केल्यावर अनेक अडचणी आल्या. कारण लोकांनी कधीही ऑनलाइन जेवण ऑर्डर केले नव्हते. जेवण कसे असेल याची कल्पना त्यांना नव्हती. ते वेळेवर येईल की नाही. की आपले पैसे बुडतील अशी भिती लोकांच्या मनात होती. अशा प्रत्येक समस्यांना दीपंदर याने तोंड दिले पण हार मानली नाही. त्याला मित्र पंकज चढ्ढाने ही साथ दिली आणि दोघांनी मोठा संघर्ष करुन आज हजारो कोटींची कंपनी उभारली.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.