कोल इंडियासह दिग्गज कंपन्यांना पछाडत झोमॅटोचा रेकॉर्ड, IPO तून जबरदस्त कमाई

मुंबई शेअर बाजार (BSE) 126 रुपयांवर बंद झाला. कंपनीची बंपर कमाई झालीय, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य 98,732 कोटी रुपये झाले.

कोल इंडियासह दिग्गज कंपन्यांना पछाडत झोमॅटोचा रेकॉर्ड, IPO तून जबरदस्त कमाई
फूड डिलिव्हरी अॅपचा रेस्टॉरंटमध्ये समावेश होणार! जाणून घ्या जीएसटीचे नियम काय असतील?
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 12:55 PM

नवी दिल्लीः फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपला IPO बाजारात दाखल करून एक जबरदस्त विक्रम केलाय. यादीनंतर कंपनीच्या शेअरने शुक्रवारी जबरदस्त कामगिरी केली. हे शेअर्स 53 टक्क्यांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध झाले असून, ते 76 रुपयांच्या आयपीओ किमतीपासून 115 रुपयांवर गेलेत. मुंबई शेअर बाजार (BSE) 126 रुपयांवर बंद झाला. कंपनीची बंपर कमाई झालीय, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य 98,732 कोटी रुपये झाले.

झोमॅटोनं कोल इंडियासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले

कमाईच्या बाबतीत, झोमॅटोने टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि कोल इंडियासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकलेय. झोमॅटोच्या आयपीओचे मूल्यांकन तज्ज्ञांकडून अंदाजे 60,000 कोटी रुपये इतके झाले होते. पण आयपीओला 38 वेळा जास्त बोली मिळाल्या, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. झोमॅटोच्या यशामुळे नव्या युगात टेक कंपन्यांना त्यांच्या व्यापारी बँकर्ससह सार्वजनिकपणे जाण्याचा आत्मविश्वास वाढणार आहे.

इतर कंपन्यादेखील या रांगेत

डिजिटल पेमेंट सोल्यूशन कंपन्या पेटीएम आणि मोबिक्विक, ऑनलाईन ऑटो क्लासिफाइड कंपनी कारट्रेड आणि ई-कॉमर्स लॉजिस्टिक स्टार्टअप दिल्लीव्हरी यांनी आयपीओसाठी यापूर्वी अर्ज केलेत. इतर अनेक टेक-सक्षम कंपन्या पीई-चालित विकासाच्या अंतिम टप्प्यात आहेत, ज्यासाठी झोमॅटो एक प्रकारची चाचणी कंपनी आहे. झोमॅटो ही भारतातील पहिल्या 50 सर्वात महत्वाच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे, ज्यांचे बाजार मूल्य अंदाजे 13.3 अब्ज डॉलर्स आहे. जागतिक स्तरावर ते अजूनही मागे आहेत.

तंत्रज्ञानाचा फायदा होणार

टीओआयच्या अहवालानुसार, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस रमेश यांचे म्हणणे आहे की, झोमॅटोची बाजारपेठेत जोरदार उपस्थिती हे सिद्ध करते की गुंतवणूकदारांना आज नवीन युगात तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे दबदबा निर्माण करायचा आहे. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने इंटरनेटची प्रवेश वाढत आहे आणि दर महिन्याला लोक स्मार्टफोन घेत आहेत, संपत्ती निर्मितीसाठी एक नवीन डिजिटल वातावरण तयार होत आहे आणि यामुळे येणाऱ्या काळात आपला भांडवली बाजार आणखी मजबूत होईल.

संबंधित बातम्या

आयकर दिनानिमित्त SBI कडून करदात्यांना जबरदस्त ऑफर, सीए सेवा फक्त 199 रुपयात

Fuel Price: पेट्रोल-डिझेल झालं, मग CNG ही झाला, आता विमानाचं इंधनही महागलं

Zomato’s record of beating giants including Coal India, huge earnings from IPO

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.