Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंडच्या तरुणाची गगनभरारी, अ‍ॅमझॉनकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज; जाणून घ्या शुभम राजचा प्रेरणादायी प्रवास

झारखंडमधील (Jharkhand) तरुण देखील आता मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये आपली जागा निर्माण करत असल्याचे पहायला मिळत आहे. झारखंडमधील एका तरुणाला अ‍ॅमझॉन बर्लिनमध्ये (Amazon Berlin) जॉबची संधी मिळाली आहे. या तरुणाला कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

झारखंडच्या तरुणाची गगनभरारी, अ‍ॅमझॉनकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज; जाणून घ्या शुभम राजचा प्रेरणादायी प्रवास
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 7:57 PM

Success Story : झारखंडमधील (Jharkhand) तरुण देखील आता मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये आपली जागा निर्माण करत असल्याचे पहायला मिळत आहे. झारखंडमधील एका तरुणाला अ‍ॅमझॉन बर्लिनमध्ये (Amazon Berlin) जॉबची संधी मिळाली आहे. या तरुणाला कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शुभम राज (Shubham Raj) असे या तरुणाचे नाव असून, तो रांचीचा रहिवाशी आहे. शुभम राज याची कंपनीमध्ये सॉफ्टवअर डेव्हलपर इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम राज याचा कोडिंगमध्ये हातखंडा आहे. या तरुणावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केलाय. शुभम बद्दल अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यापूर्वी देखील शुभम राज याला अनेक कंपन्यांकडून जॉबची ऑफर आली असल्याची माहिती त्याने दिली.

शुभेच्छांचा वर्षाव

रांची स्थित मदन सिंह आणि रीना सिंह यांच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा मुलाग शुभम राज याला अ‍ॅमझॉन सारख्या मोठ्या कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. शुभम राज हा अ‍ॅमझॉनच्या बर्लिन ऑफीसमध्ये काम करणार आहे. तो कंपनीमध्ये सॉफ्टवअर डेव्हलपर इंजिनिअर म्हणून नियुक्त झाला आहे. ही बातमी कळताच मदन सिंह यांच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. 2021 मध्ये शुभम राज यांची निवड जागतिक स्तरावरील स्पर्धा असलेल्या गूगल समर ऑफ कोड साठी देखील झाली होती. या नंतर आपल्या करीअरचा मार्ग अधिक सोपा झाल्याची माहिती शुभम राज याने दिली.

रांचीमध्येच घेतले 12 वी पर्यंतचे शिक्षण

शुभम यांने रांचीमध्येच 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या शुभम राज याला त्यानंतर आयआयटीला प्रवेश मिळाला. शुभम सध्या आयआयटी अगरतळामध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अ‍ॅमझॉनसाठी बर्लिनमध्ये काम करणार आहे. त्याने अकरावीत असल्यापासूनच कोडिंगचा अभ्यास सुरू केला होता. सुरुवातीपासूनच कोडिंगची आवड होती. या क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला होता. आजा मला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया शुभम राज यांने दिली.

संबंधित बातम्या

तुम्हाला सुद्धा IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन!!

लिंक्डइन सर्वे: यंदा नोकरी बदलाची लाट, 82% कर्मचाऱ्यांचा जॉब चेंजचा मूड!

ESIC Recruitment : ईएसआयसीच्या महाराष्ट्र विभागत 594 पदांवर भरती, 25 ते 81 हजारांपर्यंत पगाराची संधी

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.