SBI Clerk recruitment 2022 | स्टेट बँकेत 5 हजार क्लर्कच्या जागा, जाणून घ्या कसं अप्लाय करणार..

SBI Clerk recruitment 2022 | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) सध्या 5,008 लिपीक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तुम्ही या नोकरीसाठी अर्ज केला का? sbi.co.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल, पण ही माहिती जरुर वाचा..

SBI Clerk recruitment 2022 | स्टेट बँकेत 5 हजार क्लर्कच्या जागा, जाणून घ्या कसं अप्लाय करणार..
चला करा तयारी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 1:08 PM

SBI Clerk recruitment 2022 | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरची संधी (Job) तुमच्यासाठी चालून आली आहे. आता गरज आहे तुमच्या मेहनतीची. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) लिपीक वर्गात नोकरीची संधी आहे. Clerk Cadre (Customer Support and Sales) मध्ये 5000 हून अधिक पदांची भरती होणार आहे. तुम्ही तयार आहात की नाही?

27 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 ही आहे.

5,008 पदांसाठी भरती प्रक्रिया

बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरात एकूण 5,008 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

पदासाठी अर्ज शुल्क

या पदांसाठी प्रवर्गानुसार शुल्क अदा करावे लागेल. General/OBC/EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांना 750 रुपये अदा करावे लागतील. तर SC/ ST/ PwBD/ DESM या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.

परीक्षा कधी होणार

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षा होत आहे. डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान मुख्य परीक्षा होईल.

एसबीआय लिपीक : या दोन पदांसाठी भरती

General: 2143 पदे Other Backward Caste ( OBC): 1165 पदे Economically Weaker Sections (EWS): 490 पदे Scheduled Caste (SC): 743 पदे Scheduled Tribe (ST): 467 पदे

पात्रता आणि वयाचे बंधन काय

SBI क्लर्क परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्षा दरम्यान असावे. इंटीग्रेटेड ड्यूल डिग्री (IDD) प्राप्त उमेदवारांनी त्यांची परीक्षा 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

लिपीक पदासाठी वेतन किती?

SBI Clerk पदासाठी उमेदवारांना 19,900 रुपये मूळ वेतन मिळेल.

SBI Clerk भरती 2022: अर्ज कसा कराल

Step 1:

सर्वात अगोदर SBI च्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर जा

Step 2:

“Careers” या पेजवर क्लिक करा

Step 3:

याठिकाणी SBI Clerk 2022 apply online या लिंकवर क्लिक करा

Step 4:

यानंतर new registration वर क्लिक करा. online SBI Clerk 2022 नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर एसबीआय क्लर्क परीक्षा ओळखपत्रासाठी लॉगिन तपशील द्या आणि त्याचा उपयोग करा

Step 5:

निहीत स्वरुपात छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा

Step 6:

शुल्क भरा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.