लिंक्डइन सर्वे: यंदा नोकरी बदलाची लाट, 82% कर्मचाऱ्यांचा जॉब चेंजचा मूड!
लिंक्डनचा (LINKEDIN) अहवाल 1111 कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. नोकरी बदलण्याचे कारणे वेगवेगळी आहेत. काम आणि वैयक्तिक (LIFE-WORK AMBULANCE) आयुष्याचे संतुलन राखता येत नसल्यामुळे 30 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात जॉब मार्केटमध्ये (JOB MARKET) मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आघाडीचे जॉब सर्च इंजिन ‘लिंक्डइन’ने नुकताच सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला आहे. त्यानुसार 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या फ्रेशर्सची आहे. 92 टक्के फ्रेशर्सनी वर्ष 2022 मध्ये नोकरी बदलणार असल्याचे म्हटले आहे. लिंक्डनचा (LINKEDIN) अहवाल 1111 कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. नोकरी बदलण्याचे कारणे विविध आहेत. काम-वैयक्तिक (LIFE-WORK AMBULANCE) आयुष्याचे संतुलन न राखल्यामुळे 30 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. काम आणि कुटूंबाला योग्य वेळ मिळेल अशारितीने हे सर्व जण नवीन जागेच्या शोधात आहेत. दुसरीकडे पर्याप्त वेतन नसल्यामुळे 28 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलण्याचा कल व्यक्त केला आहे. तर 23 टक्के कर्मचाऱ्यांनी करिअरच्या प्रगतीसाठी नोकरी बदलण्याचा इरादा सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.
लिंक्डइन (LinkedIn) न्यूज इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक अंकित वेंगरलेकर यांनी 45 टक्के कर्मचारी आपल्या जॉब प्रोफाईलमध्ये संतुष्ट असल्याचे म्हटले आहे. 45 टक्के आपल्या करिअरबाबत समाधानी आहेत. तर 38 टक्के कर्मचाऱ्यांनी भविष्यात चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वेक्षणात सर्वाधिक कर्मचारी नोकरीच्या स्थिरतेच्या भीतीने ग्रासल्याचे समोर आले आहे. 71 टक्के कर्मचाऱ्यांनी कोविड पूर्व आणि कोविड काळातील नोकरी यामध्ये मोठा फरक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
मानसिक क्षमतेवर परिणाम
कोविड काळात कर्मचाऱ्यांच्या मानसिक क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. सर्वाधिक संख्येने कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. घरात एकट्याने काम, सार्वजनिक वावरावर निर्बंध, मित्रांशी संपर्क नसणे, शारिरीक हालचालींचा अभाव या कारणांमुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक क्षमेतवर दूरगामी परिणाम होत आहे.
लेडिज फर्स्ट
लिंक्डइनच्या सर्वेक्षणानुसार, नोकरी बदलण्याच्या ट्रेंडमध्ये महिला कर्मचारी आघाडीवर आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या मतानुसार काम-वैयक्तिक आयुष्यात संतुलन ठेवणे अशक्य होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोकरीत बदल करण्यास त्यांचे पहिले प्राधान्य आहे. लिंक्डइनच्या सर्वेक्षणात 321 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 43 टक्के महिला सातत्याने नव्या नोकरीच्या शोधात असल्याचे समोर आले आहे. 37 टक्के महिला काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखण्यासाठी नोकरी बदलाच्या विचारात असल्याचे म्हटले आहे.
संबंधित बातम्या
मार्केट ट्रॅकर: शेअर बाजारात घसरण, सेन्सेंक्स-निफ्टीच्या तेजीला ब्रेक; ऑटो-आयटी गडगडले
Gold Import | कोरोना काळातही सोन्याची आयात दुप्पट, भारतीय ग्राहकांची रेकॉर्डब्रेक खरेदी