AAI Recruitment 2021: एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती, परीक्षेविना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगाराची संधी
सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.
पात्र विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी भरती प्रक्रियेचं नोटीफिकेशन वाचून घ्यावे, असे आवाहन देखील एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं केले आहे. एकूण 29 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून अर्ज दाखल करण्यास उशीर न करता पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 14 जागा सीनियर असिस्टंट वित्त : 6 जागा सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 9 जागा
पात्रता
सीनियर असिस्टंट ऑपरेशन साठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. तर, सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
तिन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 निश्चित करण्यात आली आहे.
पगार
सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार सीनियर असिस्टंट वित्त : 36 हजार ते 1 लाख 10 हजार सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
आयडीबीआय बँकेत 650 पदांवर भरती
आयडीबीआय बँकेने असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 650 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
पदांची संख्या
आयडीबीआय बँकेकडून एकूण 650 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 22 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
इतर बातम्या:
VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला
IDBI Bank Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती, 29 हजारापर्यंत पगार मिळणार
AAI Recruitment 2021 airport authority of india invites application for various post check details here