AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेताय, प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली? असा कराल अर्ज; वाचा सविस्तर

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी आकाराने अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक असणारा आहे.बारावीच्या निकालानंतर केवळ नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेताय, प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली? असा कराल अर्ज;  वाचा सविस्तर
Mumbai University Image Credit source: google
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 12:28 PM

मुंबई – राज्यातील राज्य शिक्षण मंडळाचा (State Board of Education)निकाल नुकताच जाहिर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. त्याचबरोबर राज्यातील निकालाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. आता लगबग सुरू झाली आहे. ती महाविद्यालयातील पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी. एफवायला प्रवेश मिळवण्यासाठी नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे. यावर्षी निकालाचा टक्का वाढल्याने महाविद्यालयात प्रवेशाच्या कटऑफमध्येही वाढ होणार आहे.साहजिकच विद्यार्थ्यांना आवडत्या कोलॅजेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University ) संलग्न सर्व महाविद्यालये व मान्यताप्राप्त शिक्षा संस्थामध्ये प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक (Timetable)विद्यापिठीने जाहीर केले आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी आकाराने अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक असणारा आहे.बारावीच्या निकालानंतर केवळ नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुणवत्ता यादी व अन्य पुढील प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक स्वतंत्र रित्या जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले आहे. ९ जूनपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

अर्ज विक्री 9  ते 20  जून 2022 (1 वाजेपर्यंत )

हे सुद्धा वाचा

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी – 9 ते 20 जून2022 (1 वाजेपर्यंत)

ऑनलाईन फॉर्म सादर करणे  10 जून ते 20 जून 2022 (1वाजेपर्यंत)

या संकेतस्थळावर करा अर्ज

प्रवेशपूर्व ऑनलाईन अर्जसाठी विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. यामध्ये mum.digitaluniversity.ac यावर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये नोंदणी करताना सर्वातप्रथम click on Mumbai University pre Admission online Registration 2022-23 या लिंकवर क्लिक करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?.
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन.
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा.
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना.
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन...
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन....
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.