Join Indain Army: भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी ‘अग्निपथ’ बनणार नवा मार्ग, युवक होणार ‘अग्निवीर’ म्हणून सामील
मुंबईः सशस्त्र दलामध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी अग्निपथ भरती प्रवेश योजना (Agnipath Recruitment Admission Scheme) ही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर काम सुरु करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलातर्फे (Indian Army) या भरतींतर्गत तीन वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांची शिपाई म्हणून भरती केली जाणार आहे. आणि द्वारेच सैनिकांना अग्निवीर म्हणूनही ओळखले […]
मुंबईः सशस्त्र दलामध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी अग्निपथ भरती प्रवेश योजना (Agnipath Recruitment Admission Scheme) ही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर काम सुरु करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलातर्फे (Indian Army) या भरतींतर्गत तीन वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांची शिपाई म्हणून भरती केली जाणार आहे. आणि द्वारेच सैनिकांना अग्निवीर म्हणूनही ओळखले जाणार आहे. त्यानंतर संरक्षण दलाच्य (Defence Forces) निर्णयानुसार त्यांच्यापैकी काहींना त्या सेवेत ठेवण्याचा पर्याय असणार आहे. त्यामुळे या भरतींतर्गत युवकांना लष्कर, हवाई दल आणि नौदल या महत्वाच्या तीन दलांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तिन्ही दल कार्यरत असलेल्या अग्निपथ भरती प्रक्रियेविषयी अशीही माहिती देण्यात येत आहे की, प्रवेश योजनेविषयी जोरदार तयारी करण्यात येत आहे.
या बाबतची तयारी प्रशासनाकडून दोन वर्षापासूनच तयारी सुरु आहे. ज्यावेळी संरक्षण दलाने टूर ऑफ ड्यूटी (Tour Of Duty) योजनेवर चर्चा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये सैनिकांना एका अल्पकालीन करार तत्वावर (short term contract) सहभागी करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्याबरोबरच त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना ठेवले जाणार आहे. याबद्दल असेही सांगण्यात आले आहे की, संरक्षण दलाकडून यासाठी पर्यायही देण्यात आले आहेत.
‘Agnipath’ to be new entry path for youth to join Indian defence forces as Agniveers
Read @ANI Story | https://t.co/kEKRV5JoGp#Angipath #IndianArmy #Agniveer pic.twitter.com/bLZ7CBMDsh
— ANI Digital (@ani_digital) April 6, 2022
अग्निपथ योजनेला अंतिम रुप
कोरोनाच्या महामारीनंतर संरक्षण दलातील भरतीवर मोठा विपरित परिणाम झाला होता. भारतातील लष्कर, हवाई दल आणि नौदल या दलांमधून 1.25 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्यामुळे या अग्निपथ योजनेला अंतिम रुप देण्यासाठी संबंधित विभागाबरोबर काही दिवसातच महत्वाच्या बैठका होणार आहेत.
अग्निवीरांना मिळणार संधी
संरक्षण दलाकडून या कार्यक्रमासाठी (अग्निपथ योजना) सरकारला अंतिम अहवाल देण्यात येणार आहे. अग्निवीरांमधील सर्वोत्तम काही निवडक उमेदवारांना कायम ठेवले जाणार आहे. आणि इतर उमेदवारांना नागरी विभागातील नोकरी करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे लष्करी प्रशिक्षित युवकांना नोकरी देण्यासाठीही कॉर्पोरेट हाऊसेसही सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे, सशस्त्र दलातील सैनिकांच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या दोन वर्षांत मोठी कपात झाली आहे.
संबंधित बातम्या
यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! PhonePay कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार, 2800 जणांना रोजगार मिळणार
Indian Army : सैन्यात भरती होण्यास इच्छुक ? ही बातमी तुमच्यासाठीच !
NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार?