Agnipath Scheme: नोकरी 4 वर्षाची, पगार 30 हजार आणि विमा असणार 44 लाखांचा,जाणून घ्या अग्निवीरांना काय-काय मिळणार?
अग्निपथ योजना: अग्निपथ योजनेत पहिल्या वर्षी सहभागी होणाऱ्या तरुणांना मासिक 30 हजार रुपये पगारावर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पीएफ आणि ईपीएफचीही सुविधा असणार आहे. या योजनेतील अग्निवीरला पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये मिळणार असून चौथ्या वर्षापर्यंत पगार 40 हजार रुपये होणार आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 6.92 लाख रुपये होणार आहे.
नवी दिल्लीः अग्निपथ योजनेची (Agnipath Scheme) घोषणा करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Conservation Minister Rajnath Singh) यांनी सांगितले की, यामुळे रोजगाराची संधी (employment contract) वाढली आहे. अग्निवीर म्हणून काम करत असताना त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि अनुभव विविध क्षेत्रात रोजगार मिळवून देणार आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत, भारतीय सशस्त्र दलांतील व्यक्तिमत्व हे देशाच्या लोकसंख्येइतकी तरुण असावी असा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri @narendramodi today approved an attractive recruitment scheme for Indian youth to serve in the Armed Forces.
The scheme is called AGNIPATH and the youth selected under this scheme will be known as Agniveers. pic.twitter.com/ogrikrmhcz
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 14, 2022
अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी कोण पात्र असेल आणि तरुणांना कोणत्या पगाराच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत, त्याविषयीची ही संपूर्ण माहिती…
अग्निवीर कोण होऊ शकतात?
अग्निपथ योजनेतील भरतीसाठी युवकांचे वय हे 17 वर्षे 6 महिने ते 21 महिने दरम्यान असेल पाहिजे. युवकांना प्रशिक्षण कालावधीसह एकूण 4 वर्षे सशस्त्र सेवेत सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सैन्य दलाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती केली जाणार आहे.
हे वार्षिक पॅकेज असेल
अग्निवीरांसाठी पहिल्या वर्षी तरुणांना मासिक 30 हजार रुपये मानधनावर ठेवण्यात येणार आहे. तर ईपीएफ आणि पीपीएप या सुविधांसह अग्निवीरला पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये मिळणार आहेत. चौथ्या वर्षापर्यंत पगार 40 हजार रुपये म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे 6.92 लाख रुपये होणार आहे.
हे भत्ते पॅकेजसोबत मिळतील
अग्निवीरांसाठी सरकारकडून वार्षिक पॅकेजसह काही भत्तेदेखील उपलब्ध असणार आहेत. यामध्ये रिस्क अँड हार्डशिप, रेशन, ड्रेस आणि प्रवास भत्ता यांचा समावेश असणार आहे. सेवेदरम्यान अक्षम असल्यास, पूर्ण वेतन आणि सेवा नसलेल्या कालावधीसाठी व्याजदेखील उपलब्ध असणार आहे. ‘सेवा निधी’ला प्राप्तिकरातून सूट दिली जाणार आहे. अग्निवीरला ग्रॅच्युइटी आणि पेन्शनचे लाभ मिळणार नाहीत. अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या कार्यकाळासाठी 48 लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र दिले जाईल
राष्ट्रसेवेच्या या काळात अग्निवीरांना विविध लष्करी कौशल्ये आणि अनुभव, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या चार वर्षांच्या कार्यकाळानंतर, अग्निवीरांना नागरी सेवा सुविधेमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी अग्निवीरांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
सेवा निधीमुळे तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील
अग्निवीर, त्याच्या तारुण्यात चार वर्षे पूर्ण केल्यानंतर, व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या प्रौढ आणि स्वयंशिस्त असेल. अग्निवीरच्या कार्यकाळानंतर नागरी जगामध्ये त्याच्या प्रगतीसाठी जे मार्ग आणि संधी उघडतील ते नक्कीच राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक मोठे प्लस असेल. याव्यतिरिक्त, सुमारे 11.71 लाख रुपयांचा सेवा निधी अग्निवीरला त्याच्या भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करेल जे सहसा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील तरुणांवर होते.
4 वर्षांनंतर सैन्य भरतीसाठी स्वयंसेवक होण्याची संधी
कुशल आणि सक्षम असणारे 25 टक्के अग्निवीरही सैन्यात ठेवले जाणार आहेत. मात्र, त्या वेळी सैन्यात भरती झाली तरच हे शक्य होणार आहे. यासाठी 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले अग्निवीर स्वयंसेवक म्हणून काम करू शकणार आहेत. या प्रकल्पामुळे लष्कराचीही कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकणार आहे.