ALP Vacancy: रेल्वेत इंजिन ड्रायव्हर बनण्याची संधी, सहाय्यक लोको पायलटची बंपर भरती, या दिवसापासून अर्ज करा
RRB ALP Recruitment 2025: रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ( ALP ) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी मोठी संधी आली आहे. जे लोक या पदांसाठी अर्ज करीत आहेत. त्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी...

रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. रेल्वेमध्ये रेल्वे भरती बोर्डाने (RRB ) सहाय्यक लोको पायलट (ALP) भरती 2025 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियेला सुरुवातीच्या दोन दिवसांसाठी स्थगिती दिली होती. आधी ही प्रक्रीया 10 एप्रिल रोजी सुरु होणार होती. आता ही प्रक्रीया 12 एप्रिलपासून सुरु होणार आहे.ही माहीती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या नोटीसीत दिली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख बदललेली नसून ती 11 मे 2025 ठेवलेली आहे.
या भरती मोहिमेत देशभरातून विविध प्रकारच्या रेल्वे भरती बोर्ड (RRB ) झोनमध्ये एकूण 9,970 पदांसाछी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.हा त्या उमेदवारांसाठी नवी संधी आहे. ज्यांना रेल्वेत नोकरीकरुन करीयर करायचे आहे. खास करुन ज्यांनी आधीच्या तारखेला अर्ज करु शकललेली नाही.
रेल्वे झोनप्रमाणे भरली जाणारी पदे
मध्य रेल्वे – 376 पदे




पूर्व रेल्वे – 868 पदे
दक्षिण रेल्वे – 510 पदे
पश्चिम रेल्वे – 885 पदे
दक्षिण पूर्वी रेल्वे – 921 पदे
उत्तर रेल्वे – 521 पदे
पूर्वोत्तर सीमांत- 125 पदे
पूर्व मध्य रेल्वे – 700 पदे
उत्तर मध्य रेल्वे – 508 पदे
पश्चिम मध्य रेल्वे – 759 पदे
दक्षिण पूर्व मध्य- 568 पदे
दक्षिण मध्य रेल्वे – 989 पदे
उत्तर पूर्व रेल्वे – 100 पदे
उत्तर पश्चिम रेल्वे – 679 पदे
मेट्रो रेल्वे कोलकाता- 225 पदे
एकूण पदांची संख्या- 9,970