Israel-Hamas War | युद्धामुळे इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरीची मोठी संधी, इतक्या लाख कर्मचाऱ्यांची मागणी

Israel-Hamas War | सध्या गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धा दरम्यान इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील कंपन्यांनीच थेट तशी मागणी केली आहे. सध्या केअरींग क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांनाच लाखाच्या घरात वेतन मिळतं.

Israel-Hamas War | युद्धामुळे इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरीची मोठी संधी, इतक्या लाख कर्मचाऱ्यांची मागणी
hamas - israel war
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 8:43 AM

जेरुसलेम : सध्या इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. गाजा पट्टीत सुरु असलेलं हे युद्ध इतक्यात थांबण्याची शक्यता नाहीय. युद्ध विराम जाहीर करण्यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढत चालला आहे. पण हमासला समूळ नष्ट करेपर्यंत थांबणार नाही, अशी प्रतिज्ञाच इस्रायलने केली आहे. त्यामुळे नजीक भविष्यात तरी यावर कुठलाही तोडगा दृष्टीपथात नाही. या युद्ध काळातच भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. तुम्ही म्हणाल, युद्धा दरम्यान कोण नोकर भरती करेल?. पण इस्रायली कंपन्या भारतीयांना नोकरीवर घेण्यासाठी तयार आहेत. त्यांनी तशी आपल्या सरकारकडे परवागनी सुद्धा मागितली आहे. 90 हजार पॅलेस्टाइनच्या जागी 1 लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी इस्रायली बांधकाम उद्योगाने आपल्या सरकारकडे परवानगी मागितली आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर ज्या पॅलेस्टिनींचे वर्क परमिट रद्द केले, त्याजागी भारतीय कामगारांना परवानगी द्या, अशी इस्रायली कंपन्यांची मागणी आहे.

7 ऑक्टोबरला हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करुन निरपराध इस्रायलींचे बळी घेतले. सर्व मर्यादा ओलांडून क्रूर अत्याचार केले. त्यानंतर इस्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. एक महिना होऊन गेला, हे भीषण युद्ध सुरु आहे. इस्रायलने आपल्याकडे नोकरी करणाऱ्या पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. “आता आमची भारतासोबत चर्चा सुरु आहे. भारतीय कामगारांची भरती करण्याच्या निर्णयाला सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे” असं इस्रायलच्या बिल्डर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष हॅम फिग्लिन यांनी सांगितलं. वेस्ट बँकमधील वॉइस ऑफ अमेरिकेच्या एका रिपोर्ट्मध्ये हे म्हटलं आहे. “इस्रायलमध्ये बांधकाम उद्योग सुरळीत सुरु रहावा तसेच स्थिती सामान्य करण्यासाठी आम्हाला भारतातून 50 हजार ते 1 लाख श्रमिकांच्या भरतीची परवानगी मिळेल” असं हॅम फिग्लिन यांनी म्हटलय.

किती हजार भारतीयांना इस्रायलमध्ये मिळणार नोकरीची परवानगी?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सध्या या रिपोर्ट्वर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली बांधकाम उद्योगात नोकरी करणाऱ्या पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 25 टक्के आहे. इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्या 25 टक्के पॅलेस्टिनींपैकी 10 टक्के श्रमिक गाजामधून आहेत, तर उर्वरित वेस्ट बँक क्षेत्रातील आहेत. मे महिन्यात इस्रायलने भारतासोबत एका करारावर स्वाक्षरी केली. त्यात 42 हजार भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची परवानगी मिळणार आहे. नर्सिग म्हणजे केअरींग क्षेत्रात भारतीय इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीवर आहेत. केअरींगमध्ये वृद्ध इस्रायली नागरिकांची देखभाल केली जाते. या केअर टेकर्सना मिळणारे वेतन लाखाच्या घरात आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.