CA Inter Result 2021 : जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमाच्या निकालाची तारीख जाहीर, येथे तपासा तपशील

उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरही निकाल मिळू शकतो, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट देऊन 17 सप्टेंबरपासून नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागताच त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल.

CA Inter Result 2021 : जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमाच्या निकालाची तारीख जाहीर, येथे तपासा तपशील
जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमाच्या निकालाची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 3:46 PM

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने सीए इंटर निकाल 2021 ची तारीख जाहीर केली आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल 19 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे. उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत साइटवर icai.org वर अधिकृत सूचना तपासू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, जुलै 2021 मध्ये आयोजित चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट परीक्षा (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) चे निकाल रविवार, 19 सप्टेंबर 2021 (संध्याकाळ)/ सोमवार, 20 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. (Announce the result date of old and new courses, check details here)

उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरही निकाल मिळू शकतो, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट देऊन 17 सप्टेंबरपासून नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागताच त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल.

ICAI CA Result 2021 या स्टेप्स करा चेक

स्टेप 1 : उमेदवार अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर जा. स्टेप 2 : आता वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर विनंती केलेली माहिती सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : आता हे तपासा. स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

CA ची फाउंडेशन, इंटर आणि फायनल परीक्षांसाठी नोंदणी सुरू

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने CA परीक्षा 2021 साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. फाउंडेशन, इंटरमीडिएट (आयपीसी), इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. जे उमेदवार नोंदणी करू इच्छितात ते icaiexam.icai.org वर ICAI च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

ICAI CA परीक्षा 2021 परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी?

उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

स्टेप 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर जा. स्टेप 2 : नंतर वेबसाईटवर दिलेल्या नोंदणीसाठी दुव्यावर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. स्टेप 4 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. स्टेप 5 : फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा. स्टेप 6 : त्यानंतर अर्ज फी सबमिट करा. स्टेप 7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. (Announce the result date of old and new courses, check details here)

इतर बातम्या

Hero MotoCorp च्या बाईक-स्कूटर महागणार, ‘या’ तारखेआधी खरेदी करा

Ganesh Darshan with Chingari | घरबसल्या घ्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन, चिंगारी अ‍ॅपचा नवा उपक्रम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.