RBI Grade B 2021 Result : ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर, थेट लिंकद्वारे चेक करा
या परीक्षेला बसलेले उमेदवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट rbidocs.rbi.org.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. (Announce the result of the first paper of RBI Officer Grade-B, check through the direct link)

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Officer Grade B Result) घेतलेल्या ऑफिसर ग्रेड-बी भरती परीक्षेच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट rbidocs.rbi.org.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 332 पदांची भरती होणार आहे. (Announce the result of the first paper of RBI Officer Grade-B, check through the direct link)
अधिकारी ग्रेड-बी (RBI Officer Grade B) पदावर जारी झालेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 जानेवारी 2021 पासून सुरू केली गेली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी होती. या रिक्त पदाचा पहिला पेपर 6 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. आता या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
भरती तपशील
या भरती अंतर्गत एकूण 332 पदांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना ऑफिसर ग्रेड बी (जनरल) ची 270 पदे, ऑफिसर ग्रेड बी (डीईआरपी) ची 29 पदे आणि रिझर्व्ह बँकेत ऑफिसर ग्रेड बी (डीएसआयएम) ची 23 पदांवर नोकरी दिली जाईल. या रिक्त स्थानाचा तपशील पाहण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.
असा चेक करा निकाल
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरुन तपासता येईल. यासाठी प्रथम rbidocs.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. येथे तुम्ही Corrigendum – Recruitment of Officers in Grade B- DR (General), DEPR/DSIM-2021 लिंकवर क्लिक करुन निकाल तपासू शकता. वेबसाईटवरील निकालांच्या पीडीएफ फाईल्स अपलोड केल्या आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या निकालांच्या पीडीएफ फाइल्स अपलोड केल्या आहेत. (Announce the result of the first paper of RBI Officer Grade-B, check through the direct link)
साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचा मात्र पुरस्कार स्वीकारण्यास नकार, कारण काय?https://t.co/yghGjQP10c#NandaKhare #SahityaAcademyAward #Udya
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
इतर बातम्या