Bank Jobs : बँकेची नोकरी ! नोकरीचं ठिकाण मुंबई, पदवीधरांनी त्वरित ‘या’ ईमेलवर अर्ज करा
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager), व्यवस्थापक (Manager), शाखा व्यवस्थापक (Branch Manager) अशा पदांसाठी जागा असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
मुंबई : कुर्ला नागरी सहकारी बँक लि. मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेलवर पाठवू शकतात. ही पदवीधारकांसाठी उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज दिलेल्या ईमेलवर पाठवावा. भरती प्रक्रियेतील एकूण पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager), व्यवस्थापक (Manager), शाखा व्यवस्थापक (Branch Manager) अशा पदांसाठी जागा असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई असून वेतन नियमांनुसार देण्यात येईल. पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 35 आणि कमाल वय 50 असावं. या संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार https://www.knsbl.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता
1. सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) – Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB
2. व्यवस्थापक (Manager) – Graduate/ CA/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB/ BE Computer or IT/ MCA/ MCM
3. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) – Graduate/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB
वयाची अट
सहाय्यक महाव्यवस्थापक – 40 ते 50 वर्षांपर्यंत
व्यवस्थापक – 40 ते 50 वर्षांपर्यंत
शाखा व्यवस्थापक – 35 ते 50 वर्षापर्यंत
महत्त्वाचे
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ईमेल)
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता – hrknb@yahoo.com
शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.knsbl.com
टीप- नोकरीबाबतच्या अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या