केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, भाभा अणु संशोधन केंद्रात या पदासाठी भरती सुरू, अर्ज करा आणि थेट..
BARC Mumbai recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरतीबद्दल अधिक.
भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 50 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 65 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया चालक पदांसाठी होत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अट लागू करण्यात आलीये. हेवी मोटार व्हेईकल आणि लाईट मोटार व्हेईकल वाहनांचे वैध लायसन्स असणे उमेदवारांकडे आवश्यक आहे. https://www.barc.gov.in/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागतील.
https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. तसेच भरती प्रक्रियेसाठी करण्याचा अर्ज देखील अधिसूचनेच्या लिंकवर मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी सुवर्णसंधी आहे.